Download App

…नाहीतर 6 डिसेंबर करण्यास हिंदू तयार; ‘ज्ञानवापी’वरुन नितेश राणेंना थेट इशाराच

Nitesh Rane News : ज्ञानवापी मशीद नसून मंदिरच आहे, हे मुस्लिम समाजाने कुठलाही वाद न करता स्विकारलं पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा 6 डिसेंबर करण्यास हिंदु तयार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाला थेट इशाराच दिला आहे. ज्ञानवापी मशीदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाला अलाहाबाद न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्यावर बोलताना नितेश राणेंनी 6 डिसेंबरला घडलेल्या घटनेची आठवणच करुन दिली आहे.

‘काहीतरी गडबडच’ म्हणणाऱ्यांना रोहित पवारांचा टोला; म्हणाले, अजितदादांचीही..,

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, मुस्लिम समाजाने समजून घेतलं पाहिजे की ज्ञानव्यापी मंदिरच आहे मशीद नाही, त्यामुळे त्यांनी लवकरात तलवकर ताबा सोडून आमच्यासोबत तिथं महाआरतीसाठी आलं पाहिजे. भारत हे एक हिंदु राष्ट्र आहे, सर्व मंदिरं तोडूनच मशीदी बनवल्या होत्या, हे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यासह मुस्लिम बांधवांनी स्विकारलं पाहिजे. हे जेवढ्या लवकर स्विकारतील तेवढं चांगल आहे. नाहीतर पुन्हा एकदा 6 डिसेंबर करण्यास हिंदु तयार असल्याचा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

Budget 2024 : दरमहिना 300 यूनिट मोफत वीज अन् 18 हजारांची बचत होणार अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

तसेच मुस्लिम समाजाला जर 6 डिसेंबरचा इतिहास पुन्हा रिपीट करायचा नसेल तर औवेसींनी आपल्या मुस्लिम बांधवांना समाजवून सांगितंल पाहिजे. ज्ञानव्यापीमध्ये मंदिरच आहे तिथं शिवलिंग आहे. हिंदु देव-देवतांचे एकूण 55 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. हे जेवढं लवकर स्विकारतील तेवढं चांगलं आहे. वेळोवेळी 6 डिसेंबरची आठवण नका करुन देऊ नाहीतर भारी पडेल तुमच्या झोपा उडतील, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्ञानवापी मशीदीतील तळघरात पूजा करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तळघरात पूजा करण्याचा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ आज वाराणसीत बंदची हाक देण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ज्ञानव्यापी मशीदीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुनावणीदरम्यान, 1991 पर्यंत व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा युक्तीवाद हिंदु पक्षाकडून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंदु पक्षाकडून मशीदीच्या तळघरात हिंदु देव-देवतांची पूजा करण्यात आली होती. न्यायालयाकडूनही ७ दिवसात पूज करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता मुस्लिम पक्षकारांकडून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

follow us