Download App

नितेश राणे तर तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा

मुंबई : नेहमी ठाकरे गटावर निशाणा साधणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राणे यांनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी केली. यावर काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही. आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

भाजप आमदार नितेश राणे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी वाद ओढवून घेतात. तसेच नेत्यांवर अत्यंत कडव्या शब्दात ते टीका करतात. यातच त्यांनी ठाकरे गटाकडून आपला मोर्चा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे वळविला. त्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाकडून देखील राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.

यावर बोलताना लोंढे म्हणाले की, आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलीकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत.

राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशाविरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले. राहुल हे दिल्लीत सरकारी घरातच राहताच, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घऱात ते राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही.

मोदींच्या हुकूमशाही कारभारामुळे देश आर्थिक संकटात, पटोलेंनी लगावला टोला

आमदार नितेश राणेंनी राहुलजी गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली त्याच राहुल गांधींच्या हाताखाली नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी दहा-बारा वर्षे काम केले आहे याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे.

रात्री झोपण्याआधी ‘या’ पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा येतील अडचणी

नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ, तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.

Tags

follow us