Nitesh Rane On Aaditya Thackeray : पाणबुडी प्रकल्प बंद पाडण्यासाठी आदित्य ठाकरेंनी प्रतत्न केले असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच घमासान सुरु आहे. अशातच आता नितेश राणे यांनी पाणबुडी प्रकल्पाबाबत तत्कालीन महाविकास आघाडीचा इतिहास काढत आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे.
श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची मागणी : फसवणूक करणारे रॅकेट ‘विहिंप’कडून उघडकीस
नितेश राणे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री दीपक केसरकरांनी या प्रकल्पाला सुरुवात केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला कोणतीही चालना दिली नाही. याउलट प्रकल्प कसा बंद पडेल, त्यावर आदित्य ठाकरे यांनी अधिक जोर दिला असून बंद पाडण्यासाठीच प्रयत्न केले असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.
राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!
तसेच आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळेच पाणबुडी प्रकल्प होऊ शकला नाही. आज गुजरात, केरळमध्येही प्रकल्पाचं काम सुरु झालं आहे, मात्र, महाराष्ट्रात अद्यापही प्रकल्पाची स्थिती जैसे थे आहे,. मात्र, महायुतीचं सरकार हा प्रकल्प कुठेही जाऊ देणार नसून सिंधुदूर्गातच हा प्रकल्प होणार असल्याचं नितेश राणेंनी ठणकावून सांगितलं आहे.
Raj Kumar Hirani : ‘डंकी’ चालला, ‘मुन्नाभाई 3’ येणार का? दिग्दर्शक हिरानींनी दिली मोठी हिंट
कोकणात सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलट-सुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी,आमच्या महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल, असं आमदार नितेश राणे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.
पाणबुडी प्रकल्प गुजरातला सुरु :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2018 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. सिंधुदूर्गच्या निवती समुद्रकिनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्प पर्यटन विभागाकडून आणण्यात आला होता. उद्धव ठाकरे सरकारने या प्रकल्पाची अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. मात्र, गुजरात सरकारने हा प्रकल्प गुजरातमध्ये राबवण्याचा कार्यक्रम सुरु केल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केला होता.