Download App

Nitesh Rane : रत्नागिरी भाजपला हवंय का? राणेंच्या ऑफरने शिंदे गटात खळबळ

Nitesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri) रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी राज्यात कोणत्याही पक्षाचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील या जागेसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांच्याकडून तशी इच्छा बोलून दाखविण्यात आली आहे. यानंतर खुद्द मंत्री सामंत यांनी देखील या मतदारसंघात जर माझ्या भावाला तिकीट दिलं तर तो तीन लाख मतांनी निवडून येईल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना मोठी ऑफरच देऊन टाकली.

‘मविआचा युवा मंत्री कोणत्या ड्रग्ज माफियांना भेटायचा?’ Nitesh Rane करणार चौकशीची मागणी

आमदार राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना उदय सामंतांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर राणे म्हणाले, मी तर म्हणतो त्या ठिकाणी जर भाजपाच्या चिन्हाचा उमेदवार उभा केला तर तो सहा लाख मतांनी निवडून येईल. आता उदयजींनी ठरवावं की तीन लाख मोठे की सहा लाख मोठे. कमळ चिन्हाचा उमेदवार असेल तर किमान सहा लाख मते त्यापेक्षा कमी नाहीच. इतक्या विक्रमी मतांनी निवडून येईल. म्हणून आम्ही त्यांना त्याचवेळी ऑफर दिली होती की भावाला पाठवा. सध्या ते कोणत्या पक्षात नाही. मध्ये त्यांनी (किरण सामंत) उगाच मशाल चिन्ह लावून उद्धव ठाकरेला मोठं करण्याचा प्रयत्न केला. पण, माझं म्हणणं असं आहे की तिथे कमळ चिन्हाचाच उमेदवार किमान सहा लाख मतांनी निवडून येणार आहे. आता मला जेवढं गणित कळतं त्यानुसार तीन पेक्षा सहा मोठेच आहेत.

हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अमरावती लोकसभ मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचे लक्षात येताच काँग्रेसकडूनही बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असल्याच्या चर्चा आहेत, असे विचारले असता राणे यांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली. महाविकास आघाडी म्हणून हे लोक एकत्रितपणे लोकसभा निवडणुका लढवतील का हाच मोठा प्रश्न आहे. आता तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.

‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

Tags

follow us