Nitesh Rane : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक आरोप केले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा आरोप आमदार राणे यांनी केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान,आमदार राणे यांनी जे आरोप केले आहेत त्यावरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे.
राणे म्हणाले, आमचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मारण्याचा कट रचण्यात आला. कुठल्या गँगला सांगितलं गेलं. कुठलं औषध पाजून, कुठलं इंजेक्शन मारून, कसा घातपात करायचा असा त्यांचा प्रयत्न होता. याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. तशी माहिती देणारी माणसंही आहेत, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत केला.
Bacchu Kadu : CM शिंदेंचं एन्काउंटर.. बच्चू कडू म्हणाले, तथ्य असेल तर..
जसं राणे साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला गेला तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत झालं आहे. तेव्हा आता या सगळ्या प्रकारांची सीबीआय चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली. दरम्यान, राणे यांनी जे आरोप केले आहेत. त्यावरून ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारणाचा पारा मात्र चढला आहे.