Rahul Narvekar News : निवडणुकीनंतर मनाविरुद्ध कौल आल्याने त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विरोधकांना सुनावलंय. विधानसभा निवडणुकीत ईव्हिएममध्ये अफरातफर झाल्याचा सूर विरोधकांकडून आवळण्यात येत आहे. तर निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलंय.
ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोंब, लोकांची माथी भडकवायची…हा डाव; उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा
पुढे बोलताना ते म्हणाले, लोकशाहीवर विरोधकांचा विश्वास नाही म्हणूनच मरकडवाडीमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न होतो आहे. आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्यात आली. त्यावेळी कुणीही कसलीही तक्रार केली नाही. आता मनाविरुद्ध कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं, हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधक करत आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काळात संविधानिक संस्थांवर असे आरोप न करता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला जो कौल आहे तो स्वीकारायला शिकलं पाहिजे. त्या जनमताचा अवमान होणं योग्य नाही, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय.
महायुतीच्या गोटातून मोठी बातमी! राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी, उद्या भरणार अर्ज…
तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मी आभार मानतो कारण या सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवत मला महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे. मी सगळ्या विधीमंडळ सहकाऱ्यांचेही मी आभार मानत, असल्याचंही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय.
माझ्यावरही अनेक टीका-टिप्पण्या…
माझ्यावरही या पूर्वी अनेक लोकांनी टीका केली. पण टीका करण्याशिवाय दुसरं काहीही त्यांनी केलं नाही. कारण मी दिलेला निकाल आहे त्यात त्रुटी दाखवण्यात कुणीही यशस्वी झालेलं नाही. उद्यापासून मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करेन तेव्हा सगळ्या सहकाऱ्यांची साथ मला लाभेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन निःपक्षपातीपणे सगळ्यांना समान न्याय मिळेल, असंही नार्वेकर म्हणाले आहेत.