Amravati MLC Result : ‘शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली’…भाजपच्या बंडखोर उमेदवाराचे स्टेट्स चर्चेत…

अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांना पराभव दिसू लागल्याने शिंदेंनी ठेवलेल्या स्टेट्सची एकच चर्चा रंगलीयं.

Sangeeta Shinde

Sangeeta Shinde

Amravati MLC Election Result : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्य बंडखोर उमेदवार संगीता बोंडे-शिंदे यांना पराभव मनाला लागलायं. निवडणुकीत अल्प मते मिळाल्याने संगीता शिंदे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केलीयं. आदरणीय गुरुजन धन्यवाद, आज खूप आनंद झाला, मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिलंय, असं स्टेट्स संगीता शिंदे यांनी ठेवलंय. त्यामुळे पराभव दिसत असल्याने संगीता शिंदे यांनी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आलीयं.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरु असली तरीही संगीता शिंदे यांच्या विजयाची शक्यता अजिबात वाटत नाही. भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी संगीता शिंदे प्रयत्नशील होत्या कारण, भाजपचे खासदार अनिल बोंडे त्यांचे बंधू आहेत. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्याने किरण सरनाईक यांना उमेदवारी मिळाली

मतमोजणीच्या 19 व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 9168 मते तर कॉंग्रेसच्या आदिती पोहरे यांना 5508 मते, शिवसेनेचे बंडखोर
उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5202 मते मिळाली असून संगीता शिंदे बोडे यांना अवघे 2112 मते मिळाल्याने त्या नाराज आहेत.

संगीता शिंदेंना विजयाचा विश्वास होता…
शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट होणार या निवडणुकीत माझा विजय होईल, असं संगीता शिंदे म्हणाल्या होत्या. माझ्यावर देवाभाऊचाही आशीर्वाद होता. माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत होता, मी नक्की विजयी होईल असं संगिता शिंदेंनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू शकलं नाही. म्हणून दुसऱ्या पसंती क्रमांकाची मतं मोजली जात आहेत. विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा आहे. कोटा कोण पूर्ण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 6966 मतांची आवश्यकता आहे.

Exit mobile version