अनिल बोंडेंची खासदारकी म्हणजे दंगलीचं गिफ्ट…; यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
Yashomati Thakur : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहे. आता कॉंग्रेसच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर निशाणा साधला. अनिल बोंडेंना मिळालेली खासदारही हे त्यांना अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे, अशी बोचरी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
”स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देवदत्त निकम रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर बनलेत”
यशोमती ठाकूर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी डॉ. अनिल बोंडे यांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, अमरावती जिल्ह्याला हिंदुत्वाची प्रयोगशाळा करण्याचं काम भाजप करतंय. मी पालकमंत्री असताना मुद्दामहून डॉ. अनिल बोडेंनी दंगली घडवल्या. बोंडेंना जी खासदारकी मिळाली, ते त्यांनी अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे. डॉ. बोंडे हे विष पेरणारे आणि धर्मभेद करणारे आहे. ते कायम दंगली घडवण्यासाठी उचापती करत असतात. त्यांचा तिवसा मतदारसंघात कट-कारस्थानाचा हेतू आहे, असंही यशोतमी ठाकूर म्हणाल्या.
आम्ही 180 जागा जिंकू… जनता निर्णय घेईल, अदृश्य शक्ती काम करतेय; बाळासाहेब थोरात
पुढं त्या म्हणाल्या, बोंडे हे शिकवलेला व्यक्ती आहे. शिक्षित असूनही ते इतके विखारी कसे वागू शकतात? त्यांच्याकडून गेल्या पाच दहा वर्षात अमरावतीचं वातावरण काहींकडून दुषित कऱण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, आम्ही ते होऊ देणार नाही, असा विश्वासही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत किती लीड घेणार? असा सवाल केला असता यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोण किती लीड घेणार, हा अंदाज कोणीही काढू शकत नाही. मोदींनी चारशे पारचा नारा दिला होता. मात्र, तसं झालं नाही. मी इकचचं सांगेल, मतदारसंघात मला चांगला प्रतिसाद आहे. निवडणूकीचं मला टेन्शन वाटत नाही. मात्र, निडणूक गांभीर्याने लढली पाहिजे. मी प्रत्येक निवडणूक गांभार्याने लढते. आम्ही आता लोकांत जात नाही. आम्ही कायम लोकांच्या संपर्कात असतो. पक्षामार्फत आम्ही कायम उपक्रम राबवत असतो. सेवा करणं हा आमचा धर्म आहे. मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं मला टेन्शन वाटत नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स मुळीच नाही, कॉन्फिडन्ट आहे, असं त्या म्हणाल्या.
आम्ही 180 जागा जिंकू… जनता निर्णय घेईल, अदृश्य शक्ती काम करतेय; बाळासाहेब थोरात