आम्ही 180 जागा जिंकू… जनता निर्णय घेईल, अदृश्य शक्ती काम करतेय; बाळासाहेब थोरात

आम्ही 180 जागा जिंकू… जनता निर्णय घेईल, अदृश्य शक्ती काम करतेय; बाळासाहेब थोरात

Congress Leader Balasaheb Thorat Criticized BJP : कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी थोरात (Congress) म्हणाले की, राज्यात 20 तारखेला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र सामोरे जात आहोत. आम्ही जनतेला 5 गॅरंटी दिल्या आहेत. जनतेला आम्ही आश्वासित केलंय. महिलांना, शेतकऱ्यांना आणि युवकांना योजना दिल्या आहेत. आरक्षणासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. कॉंग्रेस फसवणूक करत असल्याचा आरोप (BJP) झाला. वर्तमानपत्रात आमची बदनामी केली. आम्ही त्या विरोधात तक्रार केली आहे, असं कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

आमची जी जाहिरात चुकीची म्हटली जात आहे. त्याबद्दल आम्ही उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहोत. अनेक लोक भ्रष्टाचार करून सत्तेत बसले आहेत. यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा रोष आहे. जनतेला यांचे सरकार मान्य (Balasaheb Thorat Press Conference) नाही. पक्षांतर बंदीच्या कायद्याची मोडतोड यांनी केलंय. स्वायत्त संस्थेचा गैरवापर यांनी केला आहे. जनतेत मोठी नाराजी आहे. राज्यातील महिलांच्या युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं जातंय. महविकास आघाडी मोठ्या संख्येने विजयी होणार असल्याचं बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

आमच्या 50 वर्षांच्या घटनापूर्ण प्रवासात, अनुपम खेर अनेक माईलस्टोन क्षणांचा भाग ; यशराज फिल्म्स

अजित पवारांवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्याची आर्थिक शिस्त यांच्यामुळे कोलमडली. निधी देताना भेदभाव केला गेला. अर्थव्यवस्था यांनी अडचणीत आणली आहे. खुप खर्च यांनी (Assembly Election 2024) केलाय. याला शिस्त लावली पाहिजे, ती आम्ही लावणार आहोत. आताच्या अर्थमंत्र्यांच्या वेळी अर्थ खात्याचा बोजा उडाला आहे. जनतेचे हाल यांनी केले आहेत. जाहिरातीसाठी वायफळ खर्च केला गेला. अत्यंत बेशिस्तपणे अर्थखाते चालवत होते, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय.

भारतीय जनता पक्षाचे धोरण धर्मा-धर्मामध्ये वाद लावायचा हे आहे. त्यावर ते राजकारण करतात. काँग्रेस सर्वांना न्याय देणारी आणि सर्वांना सोबत घेवून जाणारी आहे, सगळ्यांना न्याय आम्ही देतो. आम्हाला जतनिहायत जनगणना करायची आहे. महायुतीमध्ये देखील मोठी बंडखोरी झालीय. सरकार महाविकास आघाडीचं बनणार आहे. आम्ही बंडखोरी थांबवण्याचे खुप प्रयत्न केले. आम्ही कुठं कमी पडलो नाही. सगळ्यांबरोबर बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मतांचं विभाजन करणं, हे भाजपचं काम आहे. नेहमी ते प्रयत्न करत असतात. अजित पवार काय म्हणतात यावर भाष्य मी करणार नाही. पण ज्यांच्यामुळे संधी मिळाली त्यांचं कायम ऋण व्यक्त केलं पाहिजे. मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
‘जय जय स्वामी समर्थ’… मालिकेने केला 1300 भागांचा टप्पा पार! जगभरातून मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद

आमच्या पुढं उद्दिष्ट वेगळी आहेत. महाविकास आघाडी म्हणुन एकत्र आलो आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्त्वाचा नाही. लोकसभेला चांगलं यश मिळालं म्हणून यंदाही यश मिळेल. जनता महाविकास आघाडीला यश देईल, आमचं सरकार येइल ते आणणं आमचं ध्येय आहे. आम्ही 180 जागा जिंकू, असा विश्वास देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय.

भुजबळांच्या विधानावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, जनता न्यायाधीश आहे. सगळ्यांना माहिती आहे की, अनेक कारवाया झाल्या आहेत. जनता निर्णय घेईल, अदृश्य शक्ती काम करत असतेच. भाजपने कायम बॅंटवारा करायचं काम केलंय, धर्माचं राजकारण केलं ही वस्तुस्थिती आहे. संविधान यांना मान्य नाही, हे जनतेला माहित आहे. त्यांनी संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय. लाल रंग म्हणून नक्षलवादी म्हणता, मग महाराज मोहिमेवर जाताना मासाहेब जिजाऊ लाल टीळा लावायच्या, हे चुकीचं होतं का? असा सवाल थोरातांनी केलाय. महाराष्ट्रात प्रियांका गांधी, राहुल गांधी सभा घेतील. रोड शो होतील, असं देखील थोरात म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube