Download App

‘Nana Patole श्रीनगरहून आल्याने …’; सुजय विखेंची जोरदार टीका

अहमदनगर : भाजपा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली. नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली. यामुळे ते असं बोलू शकतात, असं म्हणत सुजय विखेंनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) दिलेल्या चॅलेंजवरही सडकून टीका केलं.

सुजय विखे म्हणाले, नाना पटोले आत्ताशी श्रीनगरहून परत आले. त्यांना जास्त थंडी लागली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात. ते माध्यमांनी फार मनावर घेऊ नये. आम्ही भाजपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात काम करत असतो. त्यांच्या नेतृत्वातच गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्या. भविष्यातही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसह विधानसभा, लोकसभा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढवणार. त्यात पक्ष एकसंघटित राहून चांगलं काम करणार, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं.

सरकार आल्यावर गेल्या ३ महिन्यात आमचं झालेलं काम त्यांना पाहावलं जात नाही. त्यांना बोलण्याचाही अधिकार नाही. त्यांनी अगोदर त्यांच्या पक्षाचं पहावं आणि मग आमच्या पक्षावर चर्चा करावी, असं म्हणत सुजय विखेंनी पटोलेंना टोला लगावला.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या चॅलेंजवर बोलताना सुजय विखे म्हणाले, चॅलेंज देणाऱ्यांच्या पिताश्रींनी मी विधान परिषदेचा राजीनामा देईन, असंही जाहीर केलं होतं. अगोदर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. जे पक्षश्रेष्ठी आहेत, महाराष्ट्राचे ३ वर्षे मुख्यमंत्री राहिले, जे म्हणतात माझा शब्द अंतिम आहे, त्यांनीच दिलेला राजीनाम्याचा शब्द पाळलेला नाही. जोपर्यंत ते त्यांचा शब्द पूर्ण करत नाही, तोपर्यंत त्यांच्या पक्षाचा कोणताही पदाधिकारी काहीही बोलला तरी जनतेला त्या नेत्यावर आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही, असंही सुजय विखेंनी आदित्य ठाकरे याना सुनावलं.

Tags

follow us