Download App

UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’

Image Credit: Letsupp

Udayanraje Bhosle News :‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, असं उत्तर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिलं आहे. दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत (Satara Loksabha Election) शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवाराबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवत आव्हानच दिलं होतं. उदयनराजेंची स्टाईल शरद पवारांनी मारल्याने त्यांची सर्वत्रच चर्चा सुरु होती. अखेर उदयनराजे भोसलेंनी त्यावर भाष्य करीत प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

उदयनराजे भोसले म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मला वडिलधाऱ्यांसारखेच आहेत. शरद पवार वडीलधारी आहेत. ते माझ्या बारशाला आले होते. मी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. माझं बारसं ते जेवलेले आहेत. त्यामुळे माझं बारसं जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलणार? माझ्यावर कॉलर उडवल्यावरुन अनेकदा टीका-टीप्पण्या झाल्या, तुम्ही कॉलर काढून घ्या पण लोकांचा जीव काढून घेऊ शकत नाही,असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

तसेच सध्या मी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. सातारा लोकसभा निवडणुकीत उभं राहणार आहे. मी कधीच राजकारण केलं नाही. लोकहिताचं समाजकारण केलं आहे
कधीच कोणाला दुखावलं नाही लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. मला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझे सर्वच उमेदवारांसोबत संबंध चांगले आहेत. एकमेकांमध्ये वैचारिक मतभेत असू शकतात. त्यांचे विचार त्यांच्याकडे माझे विचार माझ्याकडेच. कोणाला कमी लेखण्याचा विषय नाही. श्रीनिवास पाटील कोणीही आमच्या वडिलांचे खास आहेत. त्यांचा आशिर्वाद अपेक्षित असल्याचंही उदयनराजे भोसलेंनी स्पष्ट केलं आहे.

दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास केला? त्यांनी फक्त….; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

शरद पवार वडीलधारी…
शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार? ते वडीलधारी आहेत. माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू? काय बोलणार? मी सहज कासला गेलो होतो. घाटातल्या मंदिराची यात्रा होती. तिथे लोकं रजनिकांतच्या स्टाईलबद्दल बोलत होते. तिथे माझा जीवलग मित्र होता. तो म्हणाला, तुमची काय स्टाईल? मी म्हटलं, आपली काय स्टाईल? मी कुणाचं वाईट केलं नाही. लोकांच्या हिताचं काम केलं”, असं म्हणत उदयनराजे यांनी कॉलर उडवली. “माझ्यावर कॉलर उडवण्यावरुन टीका केली. कॉलर काढून घ्या किंवा काहीही काढून घ्या. पण लोकांचा जीव तुम्ही काढून घेऊ शकत नसल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत.

मी बच्चा नाही…
त्यांचं सगळ्यांच माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल विचार करत असतील की, जाऊदे बच्चा समजके छोड देंगे. असं ते जरी म्हणत असले तरी आता दुसरी बाजू अशी आहे, लहान होतो ते ठीक आहे, पण आता बच्चा राहिलेलो नाही. मला माझं कार्य केलं पाहिजे. त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज