भाजप-मनसेचं Video War; राज यांच्या आधीच अमित साटम यांनी ‘तो’ व्हिडिओ पुढे आणला…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर करीत डिवचलंय.

Raj Thackeray

Raj Thackeray

Amit Satam Share Raj Thackeray Video : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्याची घोषणा नुकतीच झालीयं. ही घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खुद्द युतीची घोषणा करीत माझ्याकडेसुद्धा खूप व्हिडिओ आहेत, या शब्दांत भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. त्यानंतर मुंबई भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी राज ठाकरे यांचा शिवसेना सोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत डिवचलंय. त्यामुळे आता भाजप आणि मनसेमध्ये चांगलंच व्हिडिओ वॉर सुरु होणार असल्याचं बोललं जातंय.

मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यापूर्वीच मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसून आले होते. आता आम्ही एकत्र आलोयं, ते एकत्र राहण्यासाठी या शब्दांत त्याचवेळी राज यांनी आपल्या युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्याने विरोधकांकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याचं चित्र आहे.

ठाकरे बंधूंनी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी फरक पडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

साटम यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे ठाकरे काय म्हणाले?
या व्हिडिओमध्ये राज ठाकरे म्हणतात, शिवसेनेत काम करताना मला वाटलं नव्हतं माझ्यावर हा प्रसंग येईल. माझा वाद विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे, पण इथे आता बडवे स्वत:लाच आपलं मंदिर समजायला लागले आहेत. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना चार सहा कारकून सांभाळणार असतील तर ते मला मान्य नाही. ज्या लोकांना दीडदमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी शिवसेनेच्या नेतेपदाचा मी राजीनामा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं.

शिवसेना संघटना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पापाचा भागीदार मी होऊ इच्छित नाही कार्यकारी अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना द्यावं याची शिफारस मी केली होती. बहुधा तेव्हाच मी माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला असं मला वाटतंय, असं राज ठाकरे या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.

लग्नाच्या मंडपात डोक्याला शॅाट! प्रियदर्शिनी इंदलकर- अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार

दरम्यान, साटम यांनी राज ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अद्याप मनसेकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून या व्हिडिओद्वारे भाजपकडून राज ठाकरेंना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलायं. आता या व्हिडिओनंतर राज ठाकरे नेमका कोणता व्हिडिओ समोर आणणार? काय प्रतिक्रिया देणार? याकडं लक्ष लागून राहिलंय.

Exit mobile version