Download App

BJP ने विषाचा महायज्ञ मांडला, मोदी पुंगी वाजवतात, भक्त डोलतात; सामनातून भाजपवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

कर्नाटकमध्येविधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) कॉंग्रेस आणि भापज दोन्ही पक्ष या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मतदानाला फक्त काही दिवस राहिले असतांना आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका विषारी सापाप्रमाणे (poisonous snake) असल्याची टीका खर्गे यांनी केली. त्यामुळं भाजप आणि कॉंग्रेस आमनेसामने आलेत. आता या वादात ठाकरे गटाने उडी घेतली. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक मोदींनी शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला. मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून (Samana Foreword) ही टीका करण्यात आली आहे.

या अग्रलेखात लिहिलं की, BJP जवळ निवडणूक प्रचारासाठी काही मुद्देच नाहीत. अशा वेळेला खर्गे यांनी विषारी साप भाजपच्या पोतडीत पाठवला व आता पुढे काही दिवस समस्त भाजपवाले त्या सापाची पुंगी वाजवतील, त्यास दूध पाजतील. कदाचित साप व नाग ही राष्ट्रीय दैवते असून काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी सापांचा अपमान केला, त्यामुळे हिंदुत्व कसे धोक्यात आले, अशा आता पुंग्या वाजवून अंधभक्तांचे फणे डोलायला लावतील अशी खोचक टीका केली.

आदिकांची बदनामी भोवली; भाजप नेते प्रकाश चित्ते यांनी एक कोटीची नुकसान भरपाई

BJP निवडणूका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला आजू शकतो. भाजप हा पक्ष विषारी प्रवृत्तीचा, सापाप्रमाणे डूख धरून दंश करणारा, जात- धर्माचे विष पसरवून अवघ्या समाजाला त्याच विषात बेहोश करणारा पक्ष आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. पीएम पदावरील व्यक्तीला साप वगैरे असल्या उपमा देणे योग्य नाही, पण विधानसभांच्या प्रचारात पंतप्रधान पदावरील व्यक्तीने उतरणे कितपत योग्य आहे? याचा विचार भाजपप्रणीत इलेक्शन कमीशनने करायला हवा. प्रचारात विषारी फूत्कार सोडण्याचे काम मोदी व शहा करीत आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली.

अग्रलेखात लिहिलं की, मुळात नागराज-सापराज यांना हिंदू समाजात श्रद्धेचं स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यात विष असूनही पूजा होते. मग सापाची उपमा एखाद्याला दिल्याने कुणास उसळायचे कारण काय? साप हा तर बळीराजाचा मित्र आहे. सापास शेतीचा राखणदार म्हटले जाते. त्याच्या दातांत विष आहे, पण तो उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. त्याच्या शेपटीवर पाय पडल्याखेरीच तो आपला फणा काढून कुणाला विषारी दंश करत नाही. पण आता सापांपेक्षा माणसांच्या जिव्हांतले विष जास्त भयंकर असून या मानवी विषाने जे सूडाचे प्रवाह आपल्या देशात निर्माण केले आहेत ते विनाशक आहेत. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आजच्या BJP ने त्या विषाचाच महायज्ञ मांडल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

देशाची लूट करणाऱ्या उद्योगपतींना झुकतं माप देणं, त्यांना पाठीशी घालणे आणि स्वार्थापोटी त्यांचं समर्थन करणे हे तर जहराचे शेवटचे टोक आहे. आणि याच विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य हे गतप्राण झाले असून देशातील न्यायालये, संसद, आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली.

 

 

Tags

follow us