आदिकांची बदनामी भोवली; भाजप नेते प्रकाश चित्ते यांनी एक कोटीची नुकसान भरपाई

Untitled Design   2023 04 29T080242.062

BJP leader Prakash Chitte compensation of one crore : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Former Mayor Anuradha Adik) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी (वरिष्ठस्तर) भाजप नेते प्रकाश चित्ते (BJP leader Prakash Chitte) यांनी एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश बजावले. शुक्रवारी न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे, चित्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या खटल्याकडे श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले होते. आदिक यांनी 2021 मध्ये या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयात आदिक यांच्या वतीने अॅड. तुषार आदिक यांनी काम पाहिले. त्यांनी सुशील पांडे व अॅड. वैभव गुगळे यांनी साहाय्य केले.

श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी कंत्राटदाराला पुतळानिर्मितीचे काम देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा संपूर्ण घटनाक्रम आदिक यांच्या पूर्वींच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात घडला . तत्कालीन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा पुतळ्याची नियोजित जागा बदलण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ते काही लोकांचे लांलूलचालन करत आहेत. तसेच काही आपत्तीजनक वक्तव्य करून प्रकाश चित्ते यांनी आदिकांची बदनामी केली गेली असे याचिकेत म्हटले होते.

Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी

आदिकांविरूध्द खोटेनाटे आरोप करण्यात आले. त्याला कोणताही आधार नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांची तपासणी केली. यानंतर वरील निकाल देण्यात आला.

याचिकाकर्त्यांच्या वतीने पाच कोटी रुपयांचा दावा कण्यात आला. न्यायालयाने प्रकाश चित्ते यांनी नुकसानभरपाई पोटी एक कोटीर रुपये आदिक यांना देण्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, आदेशाची प्रत अद्याप वाचलेली नाही. वकिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याविरूध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करू, असे चित्ते यांनी सांगितले.

 

 

 

 

Tags

follow us