ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं मत व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. अशात आता भाजपचे प्रवक्ते शिवराय भास्करराव कुळकर्णी त्यांच्या कुटुंबातील ब्राह्मण समाजातील शिवाजी आणि संभाजी या नावांबद्दलची यादी सांगत भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. (BJP spokesperson Shivarai Bhaskarrao Kulkarni facebook post and strongly criticized Minister Chhagan Bhujbal)
छगनराव, तुमचे मतभेद असू शकतात. पण नाहक अपप्रचार करू नका. ब्राह्मण समाजातील काही उदाहरणे देतो. माझे नाव शिवराय भास्करराव कुळकर्णी, पत्नीचे सई आणि मुलाचे शंभू. (ही नावे श्रीशिवछत्रपतींना दैवत मानून ठेवली आहेत.)
अमरावतीत तपोवन स्थापणारे पहिले कुष्ठरुग्णसेवी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन, जेष्ठ संघ प्रचारक स्व. शिवरायजी तेलंग, विद्याधरजींचे पिता संभाजीराव गोखले, स्व. शिवाजीराव ओहळे परतवाडा, शिवराय अजय सामदेकर, अमरावती, शिवराय रवींद्र देशपांडे, नागपूर, शिवाजी जोशी सर, अमरावती, शिवराय प्रथमेश वानखडे (आई पूर्वाश्रमीची रसिका अजित वडवेकर ब्राह्मण ), प्रसाद शिवाजी जोशी (माझा ट्विटर वरचा मित्र ) वानगीदाखल एवढे पुरेसे आहे.
किती लोकांनी आणि किती समाजाने मुलींची नावे जिजाऊ किंवा सावित्री ठेवली यावरून कोण्या समाजाचे मूल्यमापन होऊ नये. लोकांनी नावे ठेवली नाहीत म्हणून त्यांना महापुरुषांविषयी आदर नसतो, असे नाही. तुमच्या माता-पित्यांनी तुमचे ‘छगन’ नाव का ठेवले? या नावाला काही अर्थ आहे का? असे नाव ठेवले म्हणजे ते नेमके कोणाशी निष्ठा बाळगायचे? त्यांच्यासमोरही ज्योतिबा, लहुजी, भीमराव पर्याय असतीलच न! बरं तुम्ही तुमच्या गोतावळ्यात किंवा भुजबळ कुटुंबात ज्योतिबा, सावित्री, भीमराव, अण्णाभाऊ, शाहू, लहुजी, मोहनदास, जवाहरलाल, ( सरस्वती तुम्हाला चालत नाही! ) यापैकी नावं ठेवली असतील तर जरा यादी द्या. महाराष्ट्राला कळू द्या.
बरं आता समता परिषदेच्या किती कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांचे नाव ‘छगन’ ठेवले? तुम्ही कितीही महान झाले तरी वर्तमानात आणि भविष्यात कोणीही आपल्या मुलाचे नाव छगन ठेवणार नाही. तुमचे आहे म्हणून नव्हे तर ते निरर्थक नाव आहे म्हणून. असले फालतू मापदंड वापरू नका, जरा जबाबदारीने वागा!
– नावा विषयी प्रचंड अभिमान असलेला, जातीचा गर्व नसलेला प्रामाणिक हिंदू व भारतीय शिवराय ‘कुळकर्णी’
कमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला.