Bunty Shelke on Nana Patole: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या (Mahayuti) या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला (Congress) केवळ 16 जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर आता काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी (Bunty Shelke) प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर ( Nana Patole) गंभीर आरोप केला.
नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत जर विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावं, अशी मागणी बंटी शेळकेंनी केली.
काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे आपला पराभव
विधानसभा निवडणुकीत नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके आणि काँग्रेसचे बंटी शेकळे यांच्यात लढत होती. शेळके हे विजयाचे दावेदार मानले जात होते. पण, त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर आता बंटी शेळके यांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले. प्रचारात आघाडी घेऊनही काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे आपला पराभव झाल्याचे शेळके यांनी म्हटले आहे. काँग्रेसने 101 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांनी केवळ 16 जागा जिंकता आल्या. कॉंग्रेसचा 85 जागांवर झालेल्या पराभवाला नाना पटोले कारणीभूत आहेत, असंही शेळके म्हणाले.
VIDEO : ‘आम्हाला माफ करा महाराज’…तरूणीनं चित्रपटगृहात फोडला टाहो
पुढं ते म्हणाले, आज मुंबई येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत मी नाना पटोले यांची तक्रार केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत. येत्या काळात महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकीत जर विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने आताच यात लक्ष घालून पटोलेंना बाजूला करायला हवे किंवा त्यांना समज द्यावी, अशी मागणी बंटी शेळकेंनी केली.
पटोलेंचे संघाशी संबंध…
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा आरोपही बंटी शेळके यांनी केला. ते म्हणाले, मी टिळक भवनासमोर उभा राहून सांगतोय की, नाना पटोले यांचे आजही संघाशी संबंध हेत. प्रियांका गांधी माझ्या मतदारसंघात आल्या असतानाही काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे आले नाहीत. प्रियांका गांधी फक्त शेळकेसाठी प्रचार करायला आल्या नव्हत्या. त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. पण माझ्यासाठी कॉंग्रेसची संघटना प्रचारात उतरली नाही, असं शेळके म्हणाले.