VIDEO : ‘आम्हाला माफ करा महाराज’…तरूणीनं चित्रपटगृहात फोडला टाहो
Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj Movie : “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1” हा चित्रपट (Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटातील शेवटचा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. अनेक प्रेक्षक यावेळी भावूक होत असतानाच हा सीन पाहून एका तरुणीच्या भावना अनावर झाल्या आणि तिने टाहो फोडला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली (Marathi Movie) आहे.
धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. रिलीज होताच या सिनेमाचा सगळीकडे बोलबाला आहे. या चित्रपटासंदर्भात प्रेक्षकांचे रिव्ह्यू (Entertainment News) आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान चित्रपटाशी संबंधित एका तरूणीचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल होतोय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. यामध्ये तरूणीने ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा शेवट पाहून टाहो फोडल्याचं दिसतंय.
ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका चित्रपटगृहातील आहे. यामध्ये ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा सिनेमा संपत असताना एक तरूणी रडताना दिसत आहे. तिने या सिनेमाचा शेवट पाहून टाहो फोडला आहे. मोठमोठ्याने रडत ‘आम्हाला माफ करा महाराज’ असं म्हणताना तरूणी दिसतेय. सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होतोय.
Waqf Board: सरकारचा मोठा निर्णय! वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर
चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यांमध्ये दिसतेय की, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलंय. महाराजांनी औरंगजेबाच्या छाताडावर लाथ मारून हिंदुत्वाला मिठी मारली. चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय, तर हा सीन खूप चर्चेत आलाय. राज्यभरात हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. तर प्रेक्षक देखील चित्रपटावर भरभरून प्रेम करतंय. मराठी मनाला अभिमान वाटावा असा हा सिनेमा आहे.