ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

  • Written By: Published:
ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

Devendra Fadnavis Name Confirmed for CM Post : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर आता देखील अद्याप नवं सरकार स्थापन झालं नाही. (Devendra Fadnavis ) २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यात महायुतीला दणदणीत असं यश मिळालं. २८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला २२५ जागा मिळाल्या. यात सर्वाधिक १३२ जागा भाजपला मिळाल्या होत्या.

मी काळजीवाहू मुख्यमंत्री, तुम्हाला माझा चेहरा..दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान

महायुतीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हलचाली झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असे सांगितले होते. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून तेट 5 वर्षासाठी मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आली आहे.

भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं झाल्याने आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कुठली जबाबदारी असणार आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या २ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube