“मी काळजीवाहू मुख्यमंत्री, तुम्हाला माझा चेहरा..” दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान
Eknath Shinde : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित झालं आहे. मात्र हा चेहरा कोण असेल याचा निर्णय अजून तरी झाल्याचं दिसत नाही. याच मु्द्द्यावर चर्चा करण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्या या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
दिल्लीतील आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात असे एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Eknath Shinde : ‘पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही
शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. यातील लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची आहे. जनता समाधानी आहे. यातच माझंही समाधान आहे. या बैठकीत मी माझी भूमिका जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदेंचा मूड गंभीर का झाला ?
दरम्यान, या बैठकीतील एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जेपी नड्डा आहेत. या फोटोत अमित शहा यांच्यासह सगळेच नेते हसताना दिसत आहेत. मात्र यात फक्त एकनाथ शिंदेंचा अपवाद आहे. या फोटोत शिंदे दिसत आहेत. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय गंभीर दिसत आहेत. यावरून राजकीय वर्तुळात या फोटोची तुफान चर्चा होत आहे.
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला.. CM शिंदेंचा खोचक टोला
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. एकूण 239 जागा मिळाल्या. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकत सरस कामगिरी केली. इतकेच नाही शिवसेना पुरस्कृत चार आमदारही विजयी झाले आहेत त्यामुळे शिवसेनेचे एकूण 61 आमदार झाले आहेत. असे असले तरी अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबत गूढ कायम आहे.