Ravindra Chavan : महायुती सरकारमधील (Mahayuti) नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (15 डिसेंबर) होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet expansion) अवघे काही तास उरले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे 19 मंत्री आज मंत्रिमंडळात शपथ घेणार असून मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे असतील. यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेही नाव मंत्रीपदाच्या यादीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा मिळणार असल्याची चर्चा आहे.
अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, पत्नी निकितासह तिघांच्या आवळल्या मुसक्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिपदासाठी भाजपकडून 19 आमदारांना फोन करण्यात आले. भाजपकडून काही नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर काही जणांचा पत्ता कट करण्यात आला. शिंदे सरकारच्या काळात मंत्री राहिलेले रवींद्र चव्हाण यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नाही. त्यांना भाजप नवी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
कही खुशी कही गम! भाजपाच्या ‘या’ दोन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट? पडद्यामागं काय ठरलं..
तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे हेही फडणवीस सरकारच्या काळात मंत्री होणार आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधक मानले जातात. ठाणे जिल्हा हा दोन्ही नेत्यांचे सुरुवातीचे कार्यक्षेत्र राहिले आहे. पक्षाची ताकद वाढवण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोड्या होत असतात. आता भाजपने थेट रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याच निर्णय घेतला.
रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द-
– 2007 मध्ये भाजपचे नगरसेवक
– 2007 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजपचे नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.
– 2009 मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून चव्हाण यांना तिकीट
– 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले
– 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार
– 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा.
– 2021 मध्ये कॅबिनेट मंत्री (PWD खाते)
– 2024 मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार.
मंत्रिपदासाठी भाजपकडून कोणाला फोनः
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराज भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगल प्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14.माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार