Download App

‘त्या’ गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे; सरपंच खून प्रकरणावर पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या….

सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.

Minister Pankaja Munde : सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. काही दिवसांपूर्वीच बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी विरोधकांकडून विधी मंडळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

प्रत्येक घराला सोलर पॅनल अन् भरघोस सबसिडी, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंबद्दल जाणून घ्या सर्वकाही

पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमधील सरपंचांची घटना दुर्देवी आणि संतापजनक आहे. तरुण पोराचा, आदर्श सरपंचाचा खून झालायं, तो माझा कार्यकर्ता होता. लोकसभेला त्यांनी माझं स्वागत केलं होतं. त्यांची अशी हत्या झालीयं. असं अमानवी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसला पाहिजे, सरकारही त्या दिशेने पाऊले उचलत आहे काही लोकांना पकडलंय, त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, आम्ही गुन्ह्याकडे गुन्हा, गुन्हेगाराकडे गुन्हेगार आणि राजकाराणाकडे राजकारण म्हणून पाहत असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, ‘स ला ते स ला ना ते’ या दिवशी होणार रिलीज

तसेच मी बीडमधील पोलिस अधिकारी नाही. माझ्याकडे सगळी माहिती नाही, मी काही जज नाही. या प्रकरणात विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताहेत. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल. माझ्यावरही अनेक खोटे-नाटे आरोप झाले आहेत. राजकारणात आरोप होतातच, ते सहन करावेच लागत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय.

follow us