Download App

Maharashtra Politics : भाजप उमेदवार रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल

अमरावती : आचारसहिता भंग केल्याने भाजप आमदार रणजीत पाटील (Ranjit Patil ) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानपरिषेदच्या ५ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात भाषण दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रणजीत पाटील यांनी पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काल महेश भवन येथे पदवीधरांचा मेळावा नव्हता, तर अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांचं निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मी सुद्धा हजर होतो. यामुळे हा पदवीधरांचा मेळावा होता, असं म्हणणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया रणजीत पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडे बोलण्यसाठी आता मुद्दे उरले नाहीत. यामुळे ते अशा पद्धतीने रडीचा डाव खेळत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असेल म्हणून श्रद्धांजलीच्या कार्यक्रमालाही ते सोडायला तयार नाहीत. त्याला सुद्धा त्यांनी राजकारणाचं स्वरूप दिलं आहे. इतकी खालची पातळी जर विरोधकांनी गाठली असेल, तर हे चुकीचं आहे. मी अमरावतीत गेल्यानंतर याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन प्रतिक्रिया देईल”, असेही ते म्हणाले.

Tags

follow us