Download App

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांचा अभिनव उपक्रम

अनुराधा चव्हाण म्हणाल्या, शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे काळाची गरज बनली आहे.

  • Written By: Last Updated:

संभाजीनगरः मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेच्या प्रश्न मोठा गंभीर झालाय. यावर समाजामध्ये केवळ चर्चा केली जाते. परंतु प्रत्यक्षात कृती मात्र होत नाही. परंतु फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व भाजप (BJP) नेत्या अनुराधा अतुल चव्हाण (Anuradha Chavan) यांनी यावर तोडगा काढला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवस हारतुरे, भेटवस्तू न घेता साजरा करायचा ठरविला आहे. वाढदिवसानिमित्त अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदारसंघातील (Phulambri Assembly Constituency) शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतलाय.

100 कोटी होता पगार, मस्कने राजीनामा घेतला; तरीही ट्विटरच्या माजी सीईओने केली कमाल..

या उपक्रमाबाबत अनुराधा चव्हाण म्हणाल्या, माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वजण दरवर्षी हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि विविध उपक्रमांसाठी नेहमीच आपला मौल्यवान वेळ देतात. त्याचबरोबर आर्थिक योगदानही दिले जाते. पण यंदा वेगळा विचार केला आहे. आज महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्न गंभीर आहे. त्याच अनुषंगाने शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे काळाची गरज बनली आहे. यंदा हारतुरे-बॅनरवर खर्च न करता प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

गडकरींना PM पदाची ऑफर? राऊत म्हणतात, “गडकरींच्या वक्तव्यात काही…”

त्यामुळे यंदाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांच्या योगदानातून संकलीत झालेल्या निधीतून शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करून पाठिंबा द्याल, असे आवाहन अनुराधा चव्हाण यांनी केले आहे. अनुराधा चव्हाण यांनी गणेशोत्सवामध्ये श्री गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धाही आयोजित केली आहे.

रावसाहेब दानवे, बागडे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण माजी सभापती, महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणून अनुराधा चव्हाण यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याचा आलेख चढता आहे, अशा शब्दात वाढदिवसानिमित्त भाजप नेते व महाराष्ट्र निवडणुकीचे प्रमुख रावसाहेब दानवे यांनी शुभेच्छा दिल्यात. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गरजेला धावून जाणाऱ्या अनुराधा चव्हाण

अनुराधा चव्हाण या नेहमीत समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी धावून जात असतात.अनुराधा चव्हाण या फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला आहे. त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

follow us