Download App

फडवीसांवरील टीका झोंबली! बावनकुळेंनी वाचला ठाकरेंच्या ‘कंलंकीत करंटेपणाचा’ पाढा

Image Credit: Letsupp

Chadrashekhar Bavankule on Udahav thakre : फडणवीसांच्या कारकीर्दीची तुलना करता, वयाच्या 31 व्या वर्षी माझे वडिल आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व होतं. तर पुढे वयाच्या 43 व्या त्यांचं कर्तृत्व म्हणजे माझे वडिल, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाचं परिवार. तर 60 व्या वर्षी देखील ठाकरेंचं कर्तृत्व तेच होतं. मी. माझा मुलगा मंत्री, पत्नी आणि मुख्यमंत्री एवढाचं त्यांचं कर्तृत्व असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली. (Chadrashekhar Bavankule Criticize Udhav Thackery For Criticize To Devendrs Fadanvis )

‘मोदींनी अगोदर टिळकांचं चरित्र वाचावं’; राऊतांचा खोचक सल्ला

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विदर्भ ठाकरेंनी ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असं म्हणत फडणवासांवर निशाणा साधला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी थेट फडणवीस आणि ठाकरेंच्या राजकीय कारकार्दीचा पाढाच वाचून दाखवला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘पोलीस अन् सरकारी यंत्रणा बाजूला करा, बघू तुझी मर्दानगी’; राणेंनी ठाकरेंना ललकारलं!

पुढे बावनकुळे असं देखील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा जीवनपट घेताला तर शुन्य अस्तित्व आणि कर्तृत्व असणारा व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. तसेच त्यांच्या फडणवीसांवरील वक्तव्याने नागपूरमध्ये कार्यकर्ते संतापले आहेत. त्यामुळे पुन्हा असं बोललात तर जोडे मारू असा इशारा बावनककुळेंनी ठाकरेंना दिला आहे. यावेळी बावनककुळेंनी फडणवीस आणि ठाकरेंच्या राजकीयकार्दीची तुलना केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवली. त्यानंतर ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असं म्हणत निशाणा साधला होता. त्यावरून स्वतः देवेंद्र फ़णवीसांसह भाजप नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्या गुरांचं शेणसुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. टॉयलेटमधील पेपर खालले, शेण खाल्लं, असं ठाकरे त्यामध्ये म्हणत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज