‘मोदींनी अगोदर टिळकांचं चरित्र वाचावं’; राऊतांचा खोचक सल्ला

‘मोदींनी अगोदर टिळकांचं चरित्र वाचावं’; राऊतांचा खोचक सल्ला

 Sanjay Raut On PM Modi : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषद त्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला टोला लगावला आहे. ( Sanjay Raut On PM Modi )

मी नरेंद्र मोदींना टिळकांचे चरित्र वाचायला पाठवीन, ज्यांनी कोणी हा पुरस्कार दिला त्यांना देखील पाठवीन, असा टोला राऊतांनी लगावला आहे. लोकमान्य टिळकांचा संघर्ष लोकशाही विषयी आहे. पुरस्कार स्वीकारण्याआधी मोदींनी आणि भाजप नेत्यांनी टिळकांचं चरित्र वाचायला हवं, असा खोचक सल्ला राऊतांनी दिला आहे. पुरस्कार देणाऱ्यांनी आणि पुरस्कार घेणाऱ्यांनी टिळकांचं चरित्र वाचायला हवं, असेही राऊत म्हणाले.

शिंदे सरकारसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! 12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा; SC ने स्थगिती उठवली

राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी साहेबांना लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचायला पाठवेन. तसंच, भाजपाच्या प्रमुख लोकांना लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचायला पाठवेन. लोकमान्य टिळकांचा संघर्ष, लोकमान्य टिळकांची लोकशाही संदर्भातील भूमिका, ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. हा लढा पुरस्कार देणाऱ्यांनीही आणि घेणाऱ्यांनीही समजून घेतला पाहिजे.”

दरम्यान, मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची 103वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार असून या पुरस्काराचे यंदाचे 41वे वर्ष आहे.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल दीपक टिळक यांनी सांगितले. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube