Chagan Bhujbal On Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)उपोषणाला बसल्यानंतर आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke)आणि आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar)यांच्या घरांवर दगडफेक करुन त्यांची घरं जाळण्यात आली. या घटना घडणं हे तर गुप्तचर विभागाचं, पोलिसांचं अपयश असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर राज्यभरात ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आले. त्यामध्ये गुप्तचर विभाग यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हजारो लोकं जेव्हा गावागावतून हल्ला करण्याचं प्लॅनिंग करतात, तरी पोलिसांना ही माहिती समजत नाही? असं म्हणत मंत्री भुजबळांनी गृहविभागावरही जोरदार निशाणा साधला.
Gram Panchayat Election Result वर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
जालना जिल्ह्यातील अंतवाली सराटी गावात पोलिसांवर हल्ला झाला हेदेखील समजून घेतलं पाहिजे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी भुजबळांनी केली. त्याच्यामध्ये किती पोलीस जखमी झाले? याची चौकशी कोण करणार? त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर दबाव असता कामा नये, अशीही मागणी यावेळी भुजबळांनी केली.
त्याचवेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सोडवण्यासाठी आपण सर्व मंत्री त्या ठिकाणी गेले. वातावरण शांत व्हावं म्हणून हे सर्वजण जातात, मंत्री जातात. त्या ठिकाणी न्यायमूर्ती देखील जातात.
मंत्र्यांनी जाणं एकवेळ ठीक आहे पण न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी गेले अन् त्यांना सर सर करायला लागले तर ओबीसींना त्यातून काय न्याय मिळणार? असाही प्रश्न यावेळी मंत्री भुजबळांनी उपस्थित केला.
सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आले आणि जरांगेंनी देखील सांगितले की, निजामशाहीमध्ये कुणबी असलेल्या लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र द्यायला पाहिजे, मला मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर मीही सांगितलं की, माझं काहीही म्हणणं नाही, ज्यांची वंशावळ कुणबी निघत असेल तर आरक्षण द्यायला काही हरकत नाही, असेही यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.