Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. राज्यातील दौरा कधीपासून सुरू करणार याबाबत उद्या किंवा परवा जाहीर केला जाईल. याआधीच्या दौऱ्यात ज्या ठिकाणी जाता आले नाही त्या भागात जाऊन मराठा समाजबांधवांची भेट घेणार आहे, असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून 13 जिल्ह्यांत फिरणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. मात्र आता चांगले दिवस आले आहेत. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार आहे. आपले आंदोलन लोकशाही आणि शांततेच्याच मार्गाने सुरू राहणार आहे तेव्हा उद्रेक होईल असं काही करू नका. कुणी आत्महत्याही करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

पुढील आंदोलन कसे राहणार आहे याचीही माहिती त्यांनी दिली. मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. हा दौरा कधी सुरू करणार याबाबत उद्या किंवा परवा घोषणा करणार आहोत. या दौऱ्यात राहिलेल्या भागात जाऊन समाजबांधवांची भेट घेणार आहे. त्यांना मराठा आरक्षणामागची भूमिका समजावून सांगणार आहे. तसेच आरक्षण आंदोलन सुरुच ठेवण्यासाठी 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारचे शिष्टमंडळ उद्या भेटणार 

उपोषण मागे घेताना सरकारला दिलेल्या मुदतीवरून काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत सांगितली आहे. त्यामुळे उद्या शिष्टमंडळाच्या भेटीत हा मुदतीचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे. सरकारचे शिष्टमंडळ सोमवारी पुन्हा भेटणार आहे. त्यावेळी टाइमबाँडचा मुद्दा निकाली लावणार आहोत. मराठा आरक्षणासाठी प्रथमच तीन समित्या एकत्रित काम करत आहेत. मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तींची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या प्रयत्नांना यश; मनोज जरांगेंचे उपोषण मागे : शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत काय ठरले?

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज