Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून 13 जिल्ह्यांत फिरणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत दौरा करणार असून या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील (Jalna) आंतरवाली सराटी गावातून होणार आहे. जरांगे जालना जिल्ह्याबरोबरच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही ते जाणार आहेत. सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ देत उपोषण स्थगित केले होते. उपोषण स्थगित करताना त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार तसेच राज्याचा दौरा करणार असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आजपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. आरक्षणासाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेसाठी देखील जरांगे पाटील या 13 जिल्ह्यांतील समाजबांधवांना आवाहन करतील.
OBC Meeting : अजित पवार-छगन भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसींच्या आकडेवारीवरुन भिडले…
दरम्यान, मनोज जरांगे यांनी 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले होते. सतराव्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतले होते. यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी भारावून न जाता समाजाच्या प्रश्नांचं भान ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे. मी शब्द दिलाय तुमच्या पदरात आरक्षण (Maratha Reservation) टाकणारच. याआधी मी समाजाला विश्वासात घेतलं. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का?, तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का?, हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे
सरकारला 40 दिवसांचा वेळ
सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचं खाऊन समाजाचं काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी शिंदेंना येथे आणूनच दाखवलं. तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. त्यांनाही माहिती आहे. कारण, एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतात अशी माझी खात्री आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता.