चाकणकरांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! सरपंचपदाच्या निवडणुकीत भाऊ बोराटेंचा पराभव

Rupali Chakankars या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे.

Rupali Chakanakar

Rupali Chakanakar

Chakankars suffer a big setback in the fort itself Brother santosh Borte’s defeat in the Sarpanch election : राज्यामध्ये एकीकडे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असताना अनेक ग्रामपंचायच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये बीडमधील दिवंगत संतोष देशमुख यांच्या मस्साजोगमध्ये ज्या प्रमाणे त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचा धक्कादायक निकाल आला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा राजकीय धक्का बसला आहे.

‘या’ दिवशी उलगडणार ‘तुंबाड’च्या दुनियेतील मोठे रहस्य, निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं माहेर असलेल्या दौंड तालुक्यातील नांदूर येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत चाकणकर यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांनी निवडणूक लढवली. मात्र या अत्यंत चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चाकणकर यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे. विशाल थोरात यांनी त्यांचा दारूण पराभव केला. थोरात यांनी बोराटे यांचा 304 मतांच्या फरकाने पराभव करत सरपंचपदाची खुर्ची काबीज केली आहे.

मस्साजोग पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव…

बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख तब्बल 92 मतांनी विजयी झाले आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत झाली होती. एक भावनिक वातावरण या निवडणुकीत पाहायला मिळाले. मात्र मतदारांनी अखेर स्वरूपानंद देशमुख यांना पसंती दिली आहे. मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला आहे.

Exit mobile version