Download App

अजितदादांच्या सत्तेतील एन्ट्रीने चंद्रकांत पाटलांना धास्ती ! सरकारच्या चहापान कार्यक्रमातच दिसली नाराजी

  • Written By: Last Updated:

State Legislature : राज्य विधीमंडळाचे (State Legislature) पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guest House) चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. गेल्या अधिवेशनात कट्टर विरोधक असलेला राष्ट्रवादीचा गट सत्तेत आल्याने सर्वच खूश आहेत. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. चहापानाच्या कार्यक्रमातही त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपून राहिली नाही. (Chandrakant Patil is upset with the fear of going to the post of guardian minister)

चहापान कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपापल्या समर्थकांसह एकत्र होते. आपल्या आमदारांसोबत गप्पा मारत असतांना मुख्यमंत्री शिंदे सह्याद्री अतिथिगृहात आले. मुख्यमंत्री येताच दोन्ही उपमुखमंत्री चहापान कक्षात गेले. सर्वच नेते एकत्र आल्याने हास्यगप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्याच वेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले. चंद्रकांत पाटलांचा चेहेरा चांगलाच पडलेला होता. चहापानाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर ते फारसे कुणासोबत बोलले देखील नाहीत. अजित दादांचं तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे चंद्रकांत पाटलांकडे बारीक लक्ष होते. सर्व नेते हातात चहाचा कप घेऊन फोटोसाठी उभे राहिले. पण चंद्रकांत पाटील चहापानाच्या क्रार्यक्रमाला येऊनही त्यांनी चहा घेतला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

एवढ्या कुरापती करुन यश नसल्यानं सर्व्हे पाहून झोप उडाली; रोहित पवारांचा अजिदादांवर घणाघात 

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांचे नाव कायम आघाडीवर आणले जात आहे. ही एक चिंता चंद्रकांत पाटलांना आहेच. पण जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, तोपर्यंत पुणे पालकमंत्री पद पाटलांसाठी एक दिलासा होते. मात्र, आता अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता अजित पवार पुन्हा सत्तेत आल्याने अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पदा जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं चंद्रकांत पाटील नाराज आहेत.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले आणि खातेवाटप झाले. आज मंत्रिमंडळ बैठलीत नवनियुक्त मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील दिली जाणार आहे. कदाचित पुण्याची जबाबदारी काढून घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफ असल्याने ते पालकमंत्री पदही पाटलांनी मिळणं अशक्य आहे. अशा तिहेरी फटका चंद्रकांत पाटलांना बसल्याने ते नाराज असल्यांचे बोलले जात आहे. म्हणूनच काय सरकारचा चहा पण खुद्द चंद्रकांत पाटलांना गोड लागेनासा झाला. चहापानाच्या कार्यक्रमातला त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे.

 

Tags

follow us