Chandrakant Patil on Elections to local bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Elections to local bodies) संदर्भात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळं राज्यातील महापालिकांच्या (Municipalities in the state) निवडणुका कधी होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसंदर्भात अनेक स्तरांवर वारंवार चर्चा होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लांबणीवर पडत चालल्याने राज्यातील अनेक महापालिकांचा कारभार हा सध्या प्रशासकांच्या हातात गेला आहे. ह्या निवडणुका कधी होणार, याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. कोणीही भाष्य करायला तयार नाही. अशातच आता राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकी संदर्भात मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या निडणुका कोणत्या महिन्यात होणार आहे, हे सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशा संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना पाटील यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लांबणीवर पडत चालल्याने राज्यातील अनेक महापालिकांचा कारभार हा सध्या प्रशासकांच्या हातात गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. चंद्रकांत पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका कधी होणार याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. याबाबत बोलतांना ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भातले मॅटर सध्या हे कोर्टामध्ये आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वांना कोर्ट काय निर्णय देते याची उत्सुकता लागलेली आहे. कोर्ट काय निर्णय देत… कोर्टात नेमका काय निर्णय होतो ते बघू. पण मला असं वाटतं की, स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका ह्या ऑक्टोबर महिन्यात होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान, रावरंभा चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
कोर्टात स्थानिक संस्थानच्या निवडणुकी संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. मात्र, अद्याप या निवडणुकी संदर्भात कोणताही पक्का निर्णय झाला नाही. कोर्टात फक्त तारखांवर तारखा देण्यात आहेत. ओबीसी आरक्षण, बदलेल्या वार्ड रचना ह्यामुळं ह्या निवडणुकांवर सध्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कोर्टान ठाकरे सरकारची वॉर्ड रचना मान्य केली तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारची वार्ड रचनेला मान्यता दिली तर स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांसाठी निवडणुका आयोगाला तयारी करायला बराच वेळ लागणार अशातचं चंद्रकांत पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत, असं सांगितलं आहे. त्यामुळं आता निवडणुका कधी होणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.