कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान, रावरंभा चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T151145.524

Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा गेल्या अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. (Ravrambha) ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे चाहते त्याला भरभरून प्रेम आणि कौतुक करतात. त्याच्या या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Dhamaal (@marathidhamaal)


विनोदी अभिनेता म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदा नकारात्मक भूमिकेमध्ये सर्वांना दिसून येणार आहे. कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या तो संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाकरिता लंडनला गेला आहे. तर अशातच त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटातील त्याचा लूक चाहत्यांच्या समोर आला आहे.

‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. विनोदाच्या अफलातून टायमिंगने चाहत्यांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत चाहत्यांना दिसणार आहे. त्याचं हे रूप चाहत्यांना धडकी भरवणार आहे.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

नुकताच त्याचा नव्या चित्रपटातील लूक समोर आला आहे, त्यात त्याच्या नजरेतून या व्यक्तिरेखेच्या क्रूरपणाचा अंदाज येत आहे. या भूमिकेविषयी कुशल म्हणाला, “बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणाऱ्याला नक्कीच त्याविषयी चीड येणार आहे, अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्याकरिता आव्हानात्मक होतं.

यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ही भूमिका चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे, अशी मला खात्री आहे. हा चित्रपट १२ मे रोजी चाहत्यांना भेटीला येणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us