Download App

अजितदादांनी लक्षात ठेवल पाहिजे, आपण काचेच्या घरात बसलोय- चंद्रकांत पाटील

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांना बोलावले जात नाही म्हणून त्यांनी कार्यक्रमापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांना लोकांना हसवणार बोलणं याची सवय आहे. काही पंटर असतात ना, काही बोल की हशा आणि टाळ्या वाजवणारे, स्वतःच्या पालकमंत्री कालवधीमधील अनुभव पाहणे जरुरीचे आहे. अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम ठरतात.

त्यामध्ये भांडण होतात, हा गट म्हणतो मी निधी आणला. तो गट म्हणतो मी निधी आणला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यानी जाण्याची अपेक्षा नाही. कोणताही कार्यक्रम ठरल्यानंतर व्यत्यय येऊ नये. त्यामुळे अशी परवानगी घेण्यात चुकीच काय असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

आमच्या घरातील पैसे खर्च करून अनेक सामाजिक काम करतोय. दादा, त्यामुळे सार्वजनिक निधी हा सार्वजनिकच आहे. तसेच काही ठिकाणी उद्घाटनावरून भांडण होत असून आदल्या दिवशीच उद्घाटन होत आहे.

त्यामुळे सरकारी नोकरांना सूचना देण्यात आल्या आहेत की, अधिकृत कार्यक्रम नसेल तर तुम्ही जाऊ नका अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले.

सध्या राजकीय टीका टिप्पणी होत आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, दहा बारा जणांनी एकत्रित बसून, महाराष्ट्राच्या राजकारणवर आचारसंहिता लिहिली पाहिजे. अजित पवार यांना पण ती आचारसंहिता आपोआपच लागू पडेल.

तुम्हाला उठसूठ लोकांना टपली मारण्याचा अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते. तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे.

आम्ही कोणाची काळजी करित नाही आणि घाबरत देखील नाही. तुम्ही कोणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसला होता. त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना, आपण काचेच्या घरात बसलो आहे. हे लक्षात ठेवल पाहिजे. त्यामुळे एक आचारसंहिता झाली पाहिजे. प्रत्येकाने एकमेकांना आदर दिला पाहिजे. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

Tags

follow us