Chandrasekhar Bawankule : लोकसभा पराभवानंतर आम्ही पराभवाचं आकलन करत आहोत. महाविकास आघाडीपेक्षा .03 मतांनी आम्ही मागे आहोत. त्याची कारणमिमांसा करणार आहोत. सध्या पाऊस होतोय. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. बी-बियाणाचे प्रश्न आहेत. त्यासाठी आमचे 48 निरीक्षण सध्या याची चाचपणी करत आहेत. मात्र, आमचा पराभव आम्ही स्वीकारला आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोल त होते.
लोकांना सविस्तर माहिती देणार
संविधान बदलणार, आदिवासींचे हक्क कमी करणार, 8500 बँकेत जमा करू या सगळ्या खोट्या प्रचाराचा आम्हाला फटका बसला आहे. त्यावर आम्ही आता या वर्गात जाऊ त्यांना यावर समजावून सांगू असंही बावकुळे म्हणाले आहेत. तसंच, आता मोदींनी बऱ्याच योजना आणल्या आहेत त्याबाबत लोकांना सविस्तर माहिती देणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
फडणवीसांना विनंती केली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडतील हा विषय आता संपला आहे. त्यांना विधीमंडळ गटाने विनंती केल्याने ते ऐकतील असंही बावनकुळे म्हणाले. तसंच, फडणवीस सरकारमधून बाहेर पडून नाही तर सरकारमध्ये राहूनच काम करतील. आम्ही सर्वच आमदारांनी किंवा इतर नेत्यांनी फडणवीस यांना विनंती केली आहे असं स्पष्टीकरणही दिलं आहे.
48 पैकी एकूण 17 जागा जिंकल्या
भाजपने लोकसभेच्या 28 जागांपैकी केवळ नऊ जागा जिंकल्या आहेत. महायुतीयुती ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे 48 पैकी एकूण 17 जागा जिंकल्या आहेत. विरोधी महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत.