Download App

Chandrasekhar Bawankule : ‘राष्ट्रवादी हा ओबीसी विरोधी पक्ष; त्यांनी ओबीसींचा कसा घात केला हे वडेट्टीवारांना विचारा’

Chandrasekhar Bawankule on NCP : भाजपने (BJP) ओबीसींवर अन्याय केला, ओबीसी समाजाला अन्यायकारक वागणूक दिली असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने होतो. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर याच मुद्द्यावरूर टीका केली होती. भाजपला ओबीसींचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळं खडसे, तावडे, मुंडे यांनी उमेदवारीच दिली नाही. ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) गुंताही भापजने करून ठेवल्याचं पाटील म्हणाले होते. दरम्यान, भाजपवर होणाऱ्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Chandrasekhar Bawankule said The real enemy of OBCs is NCP)

नागपूरात पत्रकारांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादीसारखा ओबीसी विरोधी दुसरा पक्ष कुठलाच नाही. राष्ट्रवादी हा कसा ओबीसी विरोधी आहे, हे तुम्ही कॉंग्रेसच्या नाना पटोले यांना विचारा…. ते चांगले सांगतील, ओबीसी आरक्षणाचा विषय किंवा ओबीसी सवलतींचा विषय आला आणि बजेटमध्ये महाज्योतीला पैसे द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीने प्रत्येक बाजूने विरोध केल्याचं ते म्हणाले.

Shaktimaan: ‘माझ्याशिवाय शक्यच नाही आता सिनेमा…’; मुकेश खन्नाचा मोठा खुलासा

ते म्हणाले, विजय वडेट्टीवर हे ओबीसी मंत्री होते, त्यांना विचार ते सांगतिल की, राष्ट्रवादीने ओबींसाचा कसा घात केला. आणि आता हे शिबिर नागपुरात घेतले. ही त्यांची नौटंकी आहे. राष्ट्रवादीचा ओबीसींशी काहीही संबंध नाही, सत्तेत असताना त्यांनी ओबीसींना न्याय दिला नाही, त्याचं सरकार असतांना त्यांनी कधी ओबीसींचा विचार केला नाही, असं बावनकुळे म्हणाले.

ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी समर्थक असल्याचा खोटा आव आणत आहे. ते ओबीसी आरक्षणाविषयी कधी गंभीर नव्हेत. महाविकास आघाडीच्या काळात ओबीसी समाजाला न्याय मिळू शकाला नाही, त्यामुळं ओबीसी आयोगाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राजीनामा दिला, असं बानकुळे म्हणाले.

ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत. राष्ट्रवादी हा ओबीसींचा शत्रू आहे. भाजपने ओबीसींवर अन्याय केला नाही. भाजपने राज्याचं प्रदेशाध्यक्ष केलं. त्याआधी ऊर्जामंत्री केलं. मी ओबीसीच आहे, मग ओबीसींवर अन्याय झाला कसा झाला, असा सवालही त्यांनी केला.

अनेकदा एकनाथ खडसे यांनीही भाजपविषयी नाराजी व्यक्त केली. आपण भाजपमध्ये असतांना ओबीसी असल्यानं आपल्यावर कायम अन्याय झाला, असं खडसे म्हणाले होते. बावनकुळेंनी खडसे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, पक्ष सोडून गेल्यावर खडसे बोलताहेत. मात्र, पक्षात असतांना भाजपने त्यांना अनेक पदे दिली. देवेंद्र फडणवीसांनी खडसे यांनी सात खाती दिली. तर त्याआधी ते कृषी मंत्री होते. राज्याचे विरोधी पक्ष नेते पदही त्यांना भाजपने दिले. पदे मिळूनही ते असं बोलतात. त्यांनी हे विसरू नाही, की त्यांना भाजपने अनेक पदे दिली, असं बावनकुळे म्हणाले.

 

Tags

follow us