Shaktimaan: ‘माझ्याशिवाय शक्यच नाही आता सिनेमा…’; मुकेश खन्नाचा मोठा खुलासा

Shaktimaan: ‘माझ्याशिवाय शक्यच नाही आता सिनेमा…’; मुकेश खन्नाचा मोठा खुलासा

Mukesh Khanna On Shaktimaan Movie : 90 च्या दशकामधील सर्वांचा आवडता सुपरहिरो अर्थात सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’वर (Shaktimaan) आधारित सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्तिमान’या सिरीयलच्या माध्यमातून मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचला आहे. आता हा ‘शक्तिमान’ रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पुन्हा बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AI Art by Surzayon (@nonfungiblefuturist.ai)


मुकेश खन्ना यांनी गेल्या वर्षी सोनी पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘शक्तिमान’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोनी पिक्टर्सने एक व्हिडीओ शेअर (Video share) करत यासंदर्भात घोषणा केली होती. देसी सुपरहोरीची सिनेप्रेमींमध्ये सुपर क्रेझ दिसून आली आहे. आता या सिनेमाची घोषणा झाल्यापासून ‘शक्तिमान’चे चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.

मुकेश खन्ना यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘शक्तिमान’बद्दल मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘शक्तिमान’ या बिग बजेट सिनेमावर सध्या जोरदार काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सिनेमा असेल. 200-300 कोटींच्या बजेटमध्ये या बहुचर्चित सिनेमाची निर्मिती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, ‘स्पायडर मॅनची निर्मिती करणारे सोनी पिक्चर्स ‘शक्तिमान’ची निर्मिती करत आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे या सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.

या सिनेमाची स्टारकास्ट काय असणार आहे, सिनेमा कोण दिग्दर्शित करणार हे लवकरच समोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता शक्तिमान हे आयकॉनिक पात्र रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत. ‘शक्तिमान’ सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सुपरहिरोच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. ‘शक्तिमान’ ही सिरीयल 13 सप्टेंबर 1997 रोजी चाहत्यांच्या भेटीला आली होती.

The Night Manager 2 Trailer: ‘हिसाब अभी बाकी है..’, ‘द नाईट मॅनेजर 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

1997 ते 2005 पर्यंत या सिरियलने चाहत्यांचे चांगलच मनोरंजन केले होते. या सीरियलमध्ये मुकेश खन्ना गंगाधर आणि शक्तिमान या भूमिकांमध्ये झळकले होते. मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर झाले आहेत. ‘शक्तिमान’ या सिरीयलसह मुकेश खन्ना वारिश, विश्वामित्र, महायोधा आणि चंद्रकांता सारख्या सिरीयलमध्ये चाहत्यांना दिसून आले आहेत. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘शक्तिमान’ या सिनेमाचा ते भाग असणार आहेत, असे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube