Download App

Chandrasekhar Bawankule : सौरभ पिंपळकर हा BJP चा कार्यकर्ता, पण त्याने धमकी दिली नाही; बावनकुळेंचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

Chandrasekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती अमरावती येथील भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं. सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या तरुणाने पवारांना ट्विटरवर धमकी दिली. यानंतर राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले. याबाबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) सौरभ पिंपळकर यांची बाजू घेत त्याची चुक झाकण्याचे काम केले. ( Chandrasekhar Bawankule said  Saurabh Pimpalkar belongs to BJP but he did not threaten)

चंद्रशेखर बावनकुळेंनी सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते सौरभचा संबंध भाजपशी जोडत आहेत. सौरभ पिंपळकर हा भाजपचाच कार्यकर्ता आहे. मात्र, त्याने कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही. सौरभ पिंपरकरच्या पोस्टमध्ये शरद पवारांना धमकी देण्याचा उल्लेख नाही. तशी धमकी त्याने दिली नाही. कुठलेही रेकॉर्ड काढून पाहा, सौरभने कधीही शरद पवारांना धमकी दिली नाही. धमकी अन्य फेसबुक अकाऊंटवरून दिली आहे, असं बावनकुळे म्हणाले.

सर्वात मोठी बातमी : पवारांनी भाकरी फिरवलीचं; सुप्रीया सुळे अन् पटेल कार्यकारी अध्यक्ष घोषित

ते म्हणाले, पवारांना धमकी दुसऱ्या अकाऊंटवरून दिली आहे. त्याचं समर्थन करणं वाईट आहे, आम्ही समर्थन करत नाही. शरद पवारांना कुणी धमकी देत असतील तर सरकार कधी सहन करणार नाही, असं बावनकुळे म्हणाले.

तसचे यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडवीसांना अनेक धमक्या दिल्या गेल्या. राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रोल केलं. धमकीवजा अश्लील भाषेत फडणवीसांबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलं, त्यावरही सरकारने कार्यवाही करावी, अशी माझी सरकारला विनंती आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

दरम्यान, अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आपल्या माणसाचं चुकलं आहे, हे भाजपने मान्य करायला पाहिजे. तुमचा दाभोळकरू करू, असं म्हणणं ही धमकी नाही का, असं म्हणणं तुमच्या विवेकबुध्दीला तरी पटतं का, असा सवाल त्यांनी केला.

तर देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही घटनेवर आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कोणी धमक्या देऊन आवाज बंद करू शकेल, असं कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. मला ना धमक्यांची चिंता आहे, ना मी अशा धमक्यांना घाबरतो, अशी प्रतिक्रया धमकी मिळाल्यावर शरद पवार यांनी दिली होती.

Tags

follow us