Chandrashekhar Bavankule : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेने प्रकाशित केलेल्या या जाहिरातीमुळे शिवसेनेने एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना त्यांची जागा दाखवून डिवचण्यात आलं आहे. या जाहिरातीचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ( Chandrashekhar Bavankule on Eknath Shinde Advertisement of Modi in Nation, Shinde in state )
‘ही मोदी अन् शाहांची सेना’; बाळासाहेबांची आठवण काढत राऊतांचा शिंदेंवर निशाणा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोण जास्त प्रसिद्ध आहे. याचा विचार आम्ही जास्त करत नाही. तर 2024 च्या निवडणुकीमध्ये कुणाला जास्त प्रसिद्धी मिळते. हे जास्त महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदीजी, देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. असं बावनकुळे म्हणाले.
Maharashtra Politics : देशात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, जाहिरातबाजीतून शिंदेंनी फडणवीसांना डिवचलं…
तसेच ते असं देखील म्हणाले की, शेवटी हा निर्णय जनतेची असतो. जनता पसंती ठरवते. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेमध्ये जाहिरातीमध्ये कुणाला पसंती मिळते याला अर्थ नसतो. शेवटी 2024 च्या निवडणुकीमध्ये कुणाला जास्त प्रसिद्धी मिळते. याला जास्त अर्थ असतो. म्हणून राज्यातील जनतेला मोदीजी, देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्याकडून आपेक्षा आहे. असं म्हणत बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंना फटकारत देवेंद्र फडणवीसच महत्त्वाचे असल्याचं अधोरेखित केलं आहे.
नेमकी काय आहे ही जाहिरात?
दरम्यान राज्यातल्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली ही जाहिरात सर्वांचच लक्ष वेधून आहे. जाहिरातीमध्ये एका सर्वेनूसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोडीला पहिली पसंती दिल्याचं दर्शवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानूसार महाराष्ट्रातल्या जनेतेने एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 % जनतेने कौल दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता 2014 च्या निवडणुकांनतर देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र असं सुत्र होतं. मात्र, अचानक शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीसांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
सर्वेक्षणात झालेल्या मतदानानूसार भाजपला राज्यात 30.2 % तर शिवसेनेला 16.2 % जनतेने कौल दिल्याचं दाखवण्यात आलं आहे. देशात मोदी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या जनतेकडून पसंती असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. सर्वेक्षणानूसार महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे सरकारसोबत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे.
अचानक देशात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे असा दावा करण्यात शिवसेनेकडून करण्यात आला असून शिवसेनेकडून अधिकृत सर्वेचा हवाला न देता राज्यात देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांनाच जनतेचा कौल असल्याचं सांगण्यात येतंय. अर्थात तुम्ही कितीही दबावतंत्राचा वापर करा पण आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसल्याचा मेसेज शिवसेनेकडून भाजपला देण्यात येत असल्याचं दिसतंय.