‘ही मोदी अन् शाहांची सेना’; बाळासाहेबांची आठवण काढत राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलीय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये युतीच्या काळात राजकारणातील विरोध महाराष्ट्रात होत होते. महाराष्ट्राला विरोधाचा वावडे नाही. ही जाहिरात सरकारची आहे की, खाजगी आहे? हे आपल्याला माहित नाही. जाहिरात सरकारी असेल तर त्याच्या वरती भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यायला हवं. ही जर जाहिरात सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाचा पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे. त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे , देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी उत्तर दिली पाहिजे, असे राऊत म्हणाले.
Maharashtra Politics : देशात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, जाहिरातबाजीतून शिंदेंनी फडणवीसांना डिवचलं…
सगळ्या वृत्तपत्रांमध्ये कोट्यावधी पैसे खर्च करून फक्त एका सर्व्हेसाठी जाहिरात देण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च केले ते कोट्यवधी रुपये सरकारचे आहेत. याच्यावर सुद्धा लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा सर्व्हे नक्की कुठे केला. महाराष्ट्रातला हा सर्व्हे आहे , असं मला वाटत नाही. एक तर हा सर्व्हे सरकारी बंगल्यात केला असावा, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुरता हा सर्व्हे असावा किंवा गुजरातमध्ये केला? महाराष्ट्रात असला सर्व्हे येऊ शकत नाही, अशा शब्दार राऊतांनी या सर्व्हेवरुन शिंदेंना टोले लगावले आहे. सर्व्हे खरा की खोटा हे जाहिरात आम्हाला यात पडायचं नाही.
कितीही कुरघोड्या करु द्या, युतीचंच सरकार आणायचंय, मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं…
सर्व्हे खरा की खोटा आम्हाला यात पडायचं नाही. फक्त या सर्व कोट्यवधींच्या जाहिरातबाजीमुळे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार मानणाऱ्या लोकांनी मोदींचा फोटो टाकला आहे, पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकला नाही म्हणजे ही सेना कोणाची आहे? या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख नाही. म्हणजे शिंदेसेना ही शिवसेना नसून मोदी शहांची सेना आहे हे स्पष्ट होते. रोज पोपटपंची सुरू आहे. आज त्यांचा मुखवटा समोर आला आहे. ही मोदी सेना आहे, ही मोदींच्या टाचे खालचे सेना आहे. शिवसेनेचा महाराष्ट्रातील हिंदुत्वाशी काडी मात्र संबंध नाही, असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला आहे.