Chandrashekhar Bawankule : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरुन टीके केल्याने राजकीय वर्तुळात वादंग पेटल्याची परिस्थिती आहे. पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी गोपीचंद पडळकरांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर अजितदादांनी पडळकरांना मोठ्या मनाने माफ करावं, असंही सांगणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
‘आदित्य ठाकरेंनी ठरवलं अन् केसरकरांना गेला कार्यकर्त्यांचा फोन’; कोकणात नेमकं काय घडलं?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गोपीचंद पडळकर जे बोलले आहेत, ते संस्कार आणि संस्कृतीला धरुन नाही, त्यांच्या विधानाला भाजप कधीच पाठीशी घालनाही नाही, कोणासोबतही कितीही मतभेत, मनभेद असले तरीही असं बोलंल नाही पाहिजे, ते आमच्या संस्कृतीत नाहीच, पडळकरांच्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही गोपीचंद पडळकर यांना मोठ्या मनाने आपण माफ करावं, असं मी स्वत: सांगणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. गोपीचंद पडळकर एक जबाबदार आमदार आहेत, भाजपने आत्तापर्यंत कोणत्याही नेत्याविरोधात अशी असंस्कार विधाने केलेली नाही, अजितदादांचं मन दुखावलं असेल तर मी स्वत: माफी मागत असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.
अनिल कपूरला दिलासा! आवाज, नाव, फोटो विनापरवानगी वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे निर्देश
फडणवीस काय म्हणाले?
गोपीचंद पडळकरांच वक्तव्य अयोग्य असून अशा प्रकराचं विधानं करणं चुकीचंच आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. या प्रकारच्या भाषेचा वापर करू नये, या शब्दांत फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना सुनावलं आहे.
काय म्हणाले होते पडळकर?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले होते, की अजित पवार यांची भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या?
अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.