राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी आहेत, म्हणूनच त्यांना निमंत्रण नव्हते: मुख्यमंत्र्याच्या मुलाची मोदींवर टीका

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी आहेत, म्हणूनच त्यांना निमंत्रण नव्हते: मुख्यमंत्र्याच्या मुलाची मोदींवर टीका

Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला आमंत्रित न करण्याशी जोडले. उदयनिधी म्हणाले, ‘संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यांनी (भाजप) तामिळनाडूतून आदिनम संतांना उद्घाटनासाठी बोलावले होते, पण देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले नव्हते.

त्यांना निमंत्रित न करण्याचे कारण म्हणजे त्या विधवा आणि आदिवासी समाजातून आल्या आहेत. हाच सनातन धर्म आहे का? पण आम्ही या विरोधात आवाज उठवत राहू असेही उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

उदयनिधी स्टॅलिन बुधवारी मदुराई येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की काल काही हिंदी कलाकार आले आणि त्यांनी नवीन संसदेला भेट दिली. पण, आमच्या अध्यक्षांना निमंत्रित केले नाही. द्रमुक युथ विंगच्या बैठकीत त्यांनी ही टीका केली.

Balasaheb Thorat : ‘पालक म्हणून रहा, मालक बनू नका’; बाळासाहेब थोरातांनी विखेंना भरला दम…

नुकत्याच आयोजित कार्यक्रमात उदयनिधी यांनी सनातन धर्मावर लोकांमध्ये फूट आणि भेदभाव वाढवल्याचा आरोप केला होता. सनातन धर्म संपवला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत महाराष्ट्रातील मीरा रोड पोलिसांनी एका व्यक्तीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे सनातन धर्माच्या अनुयायांच्या भावना आणि धार्मिक श्रद्धा दुखावल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.

टीएमसीने भाजपवर टीका केली
जुन्या संसद भवनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू यांना का आमंत्रित करण्यात आले नाही, असा सवालही तृणमूल काँग्रेसने केला होता.

महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला; राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची टीका

नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना निमंत्रण नव्हते
मे महिन्यात संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित न केल्याबद्दलही विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. 21 विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube