Balasaheb Thorat : ‘पालक म्हणून रहा, मालक बनू नका’; बाळासाहेब थोरातांनी विखेंना भरला दम…

Balasaheb Thorat : ‘पालक म्हणून रहा, मालक बनू नका’; बाळासाहेब थोरातांनी विखेंना भरला दम…

Balasaheb Thorat on Radhakrushna Vikhe: तुम्ही पालक म्हणून रहा मालक बनू नका, या शब्दांत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe patil) यांना दमच भरला आहे. राज्याला थोरात-विखे(Thorat-Vikhe) वाद नवा नाही. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पणी केल्याचं नेहमीच दिसून येतं. अशातच आता पुन्हा एकदा थोरात-विखे यांच्या शाब्दिक चकमक होत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

IND vs AUS : मोहालीत ऑस्ट्रेलियाची बादशाहात, टीम इंडियाच्या नावावर आहे नकोसा रेकॉर्ड

पुढे बोलताना थोरात म्हणाले, तुम्ही संगमनेर तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांवर दहशत माजवण्यापेक्षा जिल्ह्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहा, दहशत करुन तुम्ही तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा कोणताही विकास करु शकनार नाहीत किंवा विकास रोखू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही राहाता तालुक्यातच लक्ष घाला, तिथल्या जनतेला तुमची गरज असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Canada News : हा तर निर्लज्ज अन् वेडगळपणा; अमेरिकेतील तज्ज्ञांनी ट्रुडोंना फटकारलं

राधाकृष्ण विखे पाटील तालुक्यातील सरकारी यंत्रणांवर दहशत माजवत असल्याच आरोप करीत बाळासाहेब थोरातांनी विखेंना चांगलचं सुनावलं आहे. ते म्हणाले, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्यामुळे तुम्ही पालक म्हणूनच राहा, जिल्ह्याचे मालक बनू नका , या शब्दांत बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक प्रकारे दमच भरल्याचं पाहायला मिळालं आहे.

बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी; अनेकांच्या भुवया उंचावल्या…

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरातांनी विखेंवर गंभीर स्वरुपाचे आरोपही केले आहेत . संगमनेर तालुक्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांसह विकासकामे पूर्णत्वाकडे नेणाऱ्या ठेकेदारांना विखे पाटलांकडून धमकी, दहशत केली जात आहे, विखेंना संगमनेरचा विकास पाहावत नसून त्यांचा राग मी समजू शकतो, विखेंनी कितीही दादागिरी केली तरीही संगमनेरची जनता वाकत नसल्यानेच विखेंना वैफल्यग्रस्ताची भावना तयार झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=N8R1EYfsgyk

दरम्यान, राज्यात तलाठी भरतीसह वाळू धोरणाचा बोजवारा उडाला असून लंपी आजार वाढत आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येत असतात. मात्र, येथे येऊन ते जर दहशतीची भाषा करणार असाल तर संगमनेरची जनता कदापी ही सहन करणार नाही, असा इशारा थोरात यांनी विखेंना दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube