बाप्पाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी; अनेकांच्या भुवया उंचावल्या…
Devendra Fadnavis Raj Thackeray : राज्यात सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन होत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ऐन सणासुदीत कांदा पुन्हा रडवणार? केंद्राच्या धोरणांवर टीका करत व्यापारी संघटनांचा मोठा निर्णय
राज ठाकरे यांच्या मुंबईतील राजगडमध्ये आज गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. राज ठाकरेंसह राजकीय वर्तुळातील इतर नेत्यांच्या घरी गणरायाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थेट देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंच्या घरी आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही असल्याचं दिसून आलं आहे. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी गणरायाचं दर्शन घेतलं आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार ‘इंडिया क्लब’ होणार बंद, ‘शशी थरूर कुटुंबाचे आहे खास नाते’
काही दिवसांपूर्वीच राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता तिसऱ्या एका पक्षाचा मोठा गट सामिल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंपच झाल्याचं बोललं जात होतं. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सत्ताधारी सरकारला समर्थन देईल का? अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरु आहे.
पीएम मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा, युवका कॉंग्रेसने कापला बेरोजगारीचा केक
सध्या राज्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप-शिंदे गट तर दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यची परिस्थिती आहे, मात्र, सत्तेत सामिल झालेला राष्ट्रवादीचा अजित पवार गट आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार? यावर अद्याप अस्पष्टताच असल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मात्र, राज ठाकरेंच्या मनसेला ‘एकला चलो रे’ चा नारा असल्याचं बोललं जात आहे.
R Ashwin Birthday Special : आधी सलामीवीर, नंतर वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीत नाव कमावले
निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भेट दिल्याने ही भेट राजकीय होती की फक्त गणरायाचं दर्शनच? अशा चर्चांनी ऊत आला आहे. आगामी निवडणुकीत भाजप समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी शक्यता आहे, त्यामुळे भाजपची मनसेसोबत युती झाल्यास भाजप-शिंदे गट-मनसे महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हानच उभं ठाकणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची ही भेट राजकीय होती? गणरायाचं दर्शनासाठी? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून या भेटीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये राजकीय चर्चा झाल्या असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन निवडणुका लढवणार का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.