पीएम मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा, युवका कॉंग्रेसने कापला बेरोजगारीचा केक

  • Written By: Published:
पीएम मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा, युवका कॉंग्रेसने कापला बेरोजगारीचा केक

अहमदनगर : देशातील वाढत चाललेली बेरोजगारी आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युवकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप अहमदनगर शहर युवक कॉंग्रेसने केला. नगर (Ahmednagar) शहरातील एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन (National Jobless Day) म्हणून पाळला. यावेळी भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पीएम मोदींवर देशभरातून टीका होत असते. अशातच काल मोदींचा वाढदिवस युवक कॉग्रेसने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. यावेळी मोदी यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका करण्यात आली.

दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. वर्षाकाठी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र आजची तरुणांची परिस्थिती बिकट झाली आहे. कोट्यवधी सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. अनेक उद्योग महाराष्ट्रातून इतर राज्यात पळवण्यात आले. सरकारी आस्थापनांचे खासगीकरून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा घाट भाजपने घातला, अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार 

यावेळी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख म्हणाले की, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र तरुणांना धार्मिक राजकारणात गुंतवून त्यांना मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यात आले आहे. हाताला काम देण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकारने तरुणांची फसवणूक केली आहे. हाताला काम मिळाले नाही, मात्र चुकीच्या धोरणामुळं अनेक उद्योगधंदे बंद पडून अनेकांचा रोजगार बुडाला. मूठभर भांडवलदारांसाठी सत्ता राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनात अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अकदास शेख, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, मयूर पाटोळे, सागर इरमल, धीरज शिंदे, प्रवीण गीते, तौफीक शेख, अरबाज बेग, तौफीक जहागीरदार, मेहराज शेख, मुन्ना शेख, सुयोग कवडे, नफीस शेख, जितेंद्र यादव, सिंकदर साहनी, धर्मेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, शैलेश साहनी, जितेंद्र साहनी, आकाश लोखंड, अमित लोखंड, अनिल राव आदींसह युवक कार्यकर्ते व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube