Chandrashekhr Bavankule : 2047 पर्यंत राहुल गांधींचं पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही

अमरावती : संजय राऊत व राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]

Bavankule

Bavankule

अमरावती : संजय राऊत व राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047 ची वाट पहावी. तसेच राहुल गांधी व संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणे बंद करावे. पंतप्रधान पदाचं त्यांचं स्वप्न खरं होणार नाही. 150 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. जनतेच समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत व राहुल गांधी यांना लगावला आहे.

जनतेच्या मनात असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान होऊ शकतात. असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया देताना संजय राऊत व राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, 2024 मध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये मोठी क्रांती होणार आहे. त्यानंतर 2029 आणि 2034 ला देखील देशाच्या विकासासाठी मोदींना प्रचंड जनतेचं समर्थन मिळणार आहे. असा विश्वास यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version