Chhagan Bhujbal Finance Portfolio Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळातील बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळावं, यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. अर्थखातं सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी; राज ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधातील व्हिडिओ हटवला; म्हणाले, ‘हेतू साध्य झाला’
भुजबळ म्हणाले, “बरेच दिवस झाले, आमचं जे अर्थखातं आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी सकारात्मक चर्चा झाली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्याची मोठी जबाबदारी आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखात्याऐवजी दुसरं कोणतंही खातं नको, अशी स्पष्ट भूमिकाही भुजबळ यांनी मांडली. “आम्हाला अर्थखात्याऐवजी दुसरं कोणतंही खातं नकोय. आमच्याकडे असलेलं अर्थखातंच पाहिजे,” असं ते म्हणाले.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं नेमकं कधी देणार, याची कोणतीही तारीख सांगितली नसल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतही छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. “दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. असा कुठलाही विषय आमच्या चर्चेत नाही,” असं भुजबळ यांनी सांगितलं.
