Chhagan Bhujbal On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदान छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल, तर ताबोडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद होता कामा नये. अनेक मुस्लिम बांधवांनी काश्मीर येथे मदत केली. काश्मीर येथील नागरिकांनी निषेध केला. लढायचं असेल, तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं (Pahalgam Terror Attack) पाहिजे. सैनिकांना बळ मिळेल, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय.
एकी आणि देशाचे उत्पादन कसे वाढेल? आपल्याजवळ दहशतवादी आहे का? याकडे लक्ष दिले पाहिजे. दंगे भडकवणे हा त्यांचा उद्देश आहे. काश्मीरचा विकास कसा थांबेल? हा उद्देश आहे. जे झालं ते फार वाईट आहे. भारत सरकार आपलं ( Hindu Muslim Controversy) काम करतंय. सिंधू करारावर निर्णय झाला. विरोधकांनी पण त्यावर एकमत केलं. आपण आपले काम करणं गरजेचे आहे. आपण आपापसात काही वाद घालू नये, असं त्यांनी म्हटलंय.
“काही लोक घरातून बाहेर पडले की थेट..”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
हल्ला झाला त्या ठिकाणी घोडेवाल्यांनी देखील विरोध केला. ज्याप्रमाणे 26/11 वेळी पोलिस तुकाराम ओंबळे यांनी जीव दिला, तसेच इथे ही झाले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी पण घटनेचा निषेध केला. या परिस्थितीत काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम करत असेल, तर ते थांबले पाहिजे. काही करायचे, तर आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. मोदी सरकार त्यांचे काम करतील, लगेच ते त्यावर काही बोलतील आणि काही करतील असं नाही.
धर्म विचारून मारले ते असेल, पण तिथले काही मुस्लिम होते. भारतात दंगे पेटून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जम्मू काश्मीर येथील व्यापार आणि काही विकास थांबला पाहिजे, हा उद्देश आहे. आपण त्यावर बळी पडता कामा नये. मुस्लिम धर्म गुरूंनी त्यांच्या विरोधात निषेध केला आहे. आपण सर्व एकत्र राहिले पाहिजे, असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केलंय.
भारत सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. पाणी बंद केले, त्यावर त्यांची फार मोठी अडचण होणार आहे. ही मोठी बाब आहे. आपण आर्मीवर विश्वास ठेवला पाहिजे. बोलले अन् लगेच झाले असं होत नाही. पाण्यावर सर्व अवलंबून आहे. पाकिस्तानची मोठी अडचण होणार असल्याचं देखील आमदार छगन भुजबळांनी म्हटलंय.