Download App

फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा

Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे दिग्दर्शक प्रत्यक्ष भेटले. महात्मा फुले यांच्या लिखाणात असलेल्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.

आम्ही आजच्या ब्राम्हणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही. त्यावेळची परिस्थिती दाखवली आहे. ब्राम्हणांना यांच्यात टार्गेट केलं जात नाही. अनेक ब्राम्हण महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासोबत देखील जात होते. फुले चित्रपटातील एकही सीन कट करू नका. सत्य आहे तेच दाखवले आहे. महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेले ग्रंथ, पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले दाखवले जात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

हैवानाचं चिमुरडीसोबत संतापजनक कृत्य; काही तासांतच पोलीसांकडून एन्काऊंटरमध्ये झाला ठार

आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही. ब्राम्हण विरोधी नाही. त्यावेळी सर्व ब्राम्हण फुले यांच्या विरोधात नव्हते. कर्मठ जे ब्राम्हण आणि बहुजन लोक अंधश्रदेत होते, त्यावेळी काय परिस्थिती होती. दलितांची परिस्थिती कुणी नाकारू शकत नव्हतं. बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्यास केस कापत नव्हते. विधवांचे कर्मठ ब्राम्हण हे केस कापत होते.

पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या सहा मुली या ब्राम्हण होत्या. याच्या पूर्वी देखील आचार्य अत्रे यांचा सिनेमा आला आहे. त्यात सर्वांच्या भूमिका असून त्यातही हेच दाखवले आहे. त्याला राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यात नेमके तेच दाखवले. जगातले नामवंत लेखकांनी लिहिले असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. फुले चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळतेय.

आतमध्ये कोण-कोणाच्या पाया पडले? अमित शाहांच्या दौऱ्यावरुन जयंत पाटलांचा रोख कोणाकडे?

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने विरोध केलाय. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने देखील आक्षेप घेतल्याचं कळतंय. यामुळे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललंय. फुले चित्रपटामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ उठल्याचं पाहायला मिळतंय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ हे मात्र चित्रपटाच्या बाजूने उभे आहेत. फुले चित्रपटातील एकही प्रसंग काढू टाकू नये, अशी भूमिका भुजबळ त्यांनी घेतली आहे.

 

follow us