ब्रेकिंग : गुजरातच्या समुद्रात १८०० कोटींचे ड्रग्ज जप्त, कोस्ट गार्ड अन् गुजरात ATS ची मोठी कारवाई

Operation Samudra Manthan : गुजरात एटीएसच्या सहकार्याने भारतीय (Manthan ) तटरक्षक दलाने समुद्रात गुप्तचर माहितीवर आधारित अंमली पदार्थ विरोधी संयुक्त मोहीम राबवली. या संयुक्त कारवाईत, सुमारे १,८०० कोटी रुपयांचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थ मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय आहे.
नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर शस्त्रकिया; भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशन बनले देवदूत
गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने समुद्राच्या मध्यभागी केलेली ही संयुक्त कारवाई आंतर-एजन्सी समन्वयाचं मोठ उदाहरण होतं. या कारवाईत, गुजरात एटीएसकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने समुद्रात एक संशयास्पद बोट अडवली आणि त्यातून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला.
ऑपरेशन सागर मंथन
समुद्री मार्गाने ड्रग्ज किंवा इतर मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गेल्या वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले. त्यात एनसीबी ऑपरेशन्स शाखेचे अधिकारी, भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी तसेच भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचा समावेश होता. गेल्या वर्षी ऑपरेशन सागर मंथन अंतर्गत एकूण ३,४०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याशिवाय ११ इराणी नागरिक आणि १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांच्या धोरणानुसार कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अमली पदार्थांविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाखाली ऑपरेशन समुद्र मंथन सुरू करण्यात आले. याअंतर्गत, विविध एजन्सी संयुक्तपणे कारवाई करतात आणि समुद्री मार्गांनी होणाऱ्या ड्रग्जच्या तस्करीविरुद्ध कारवाई करतात.
Indian Coast Guard (ICG), in a joint operation with Gujarat ATS on the night of 12-13 Apr 25, seized 300 Kg narcotics worth Rs 1800 Cr off IMBL near Gujarat coast. On spotting the ICG ship, smugglers dumped contraband & fled across IMBL. Consignment recovered at sea & handed to… pic.twitter.com/FO2AMJndkY
— ANI (@ANI) April 14, 2025