Chhagan Bhujbal Says I will Resined Minister post if Dhananjay Munde got clean chit : छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा आणि प्रभावशाली ओबीसी चेहरा आहेत. सध्या ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असून, नाराजी नाट्यानंतर आता पुन्हा भुजबळांची (Chhagan Bhujbal) फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. मात्र मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही. तोच भुजबळांनी राजीनाम्याची भाषा केली आहे. यावेळी त्यांनी थेट धनंजय मुंडेंचेन नाव देखील घेतले आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळांच्या विविध वाहिन्यांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यात आज एबीपी माझा या वाहिनीला छगन भुजबळ यांनी मुलाखत दिली आहे. त्यामध्ये बोलताना छगन भुजबळांनी मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही. तोच भुजबळांनी राजीनाम्याची भाषा केली आहे. यावेळी त्यांनी थेट धनंजय मुंडेंचेन नाव देखील घेतले आहे. भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला होता की, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्याने त्यांची जागा रिक्त झाल्याने तुम्हाला मंत्रिपद मिळालं आहे. मात्र जर मुंडेंना क्लिन चिट मिळाली तर तुम्ही राजीनामा देणार का?
अजितदादांनी ठणकावल्यानंतर आयजी सुपेकर आले समोर; सर्व आरोप फेटाळत दिला इशारा
त्यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, माझी पुर्नस्थापना झालेली आहे. मी मानाने या पदावर आलेलो आहे. पण जर धनंजय मुंडे यांना क्लिन चिट मिळाली तर मी राजीनामा देईल. अशी जरी चर्चा झालेली नसली तरी देखील हे मीच ठरवणार मीच निर्णय घेणार की, जर धनंजय मुंडे परत येणार असतील तर मी राजीनामा द्यायचा किंवा नाही. असं म्हणत भुजबळ यांनी मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही. तोच राजीनाम्याची भाषा केली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच फटकेबाजी…
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदाबाबत विचारले असता. त्यांनी थेट शेरो शायरीचा आधार घेत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कधी कधी जे वाटत नाही ते सुद्धा घडत असतं. जो ख्वाबो में देखते है वो हकीकत मे कहा? जो जिंदगी सीखाती है वो किताब कहा ?
जगभरात ‘X’ची सेवा बंद; लोकांकडून तक्रारींचा पाऊस, कंपनीची सर्व्हर दुरुस्त करण्यासाठी पळापळ
मी मंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून माझे बोर्ड लागले. पण कार्यकर्त्यांना म्हटलं की, यावरून वाद विवाद वाढवू नका.मी जरी नाशिकचा पालकमंत्री नसलो. तरी देखील मी नाशिकचा बालक आहे. ते पद माझ्याकडून कुणीहा काढून घेऊ शकत नाही. कारण पालकापेक्षा बालकाला मातेबद्दल जास्त प्रेम असतं. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर सोपवून देऊ या. असं म्हणत त्यांनी पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.